Air Travel: जेट इंधनाच्या किंमतीत मोठी घसरण, विमान तिकीटांचे दर घसरण्याची शक्यता

दोन महिन्यांमध्ये विमान तिकीटांचे दर वाढल्यानंतर आज पून्हा जेट इंधनाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे.

Photo Credit- X

Air Travel Cheap: विमान प्रवास (Air Travel Cheap) करणाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. चालू सप्टेंबर महिन्यात जेट इंधनाच्या (Fuel) किंमतीत घट झाली आहे. दोन महिन्यांच्या वाढीनंतर आज इमधनाचे दर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मुळाला आहे. त्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची तिकिटे (Flight tickets) स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेट इंधन दरात घट झाल्याने हवाई भाडे कमी होण्याची शक्यता बळावली आहे. जेट इंधन वाढल्याने विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे कंपन्या त्यांची हवाई तिकिट वाढवतात. जेट इंधनात कपात केल्यानंतर कंपन्यांना तिकीट दर कमी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात प्रमुख्यांने प्रवाशांना तिकिट दरात 4 हजारांची सूट मिळणार आहे. याचा अर्थ प्रति किलोलिटर किंमती 4,495.5 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यातील आणि आत्ताचे दर

देशांतर्गत विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी जेट इंधनावर कमी खर्च करावा लागणार आहे. आता अशा विमानांना दिल्ली विमानतळावर 39.68 डॉलर स्वस्त जेट इंधन मिळेल. आता ऑगस्टच्या तुलनेत किंमत कमी होऊन 852.12 डॉलर प्रति किलोलिटर झाली आहे. मुंबईत किमती 39.72 डॉलरने कमी होऊन सध्याची किंमती 851.34 डॉलर प्रति किलोलिटर दिसत आहेत.