Air India- Vistara Partnership: एअर इंडिया आणि विस्तारा यांच्यात भागीदारी; भारतातील दोन महत्त्वाच्या विमान कंपन्या करणार सोबत काम
दोन्ही कंपन्यांनी एकमेकांशी भागीदारी करार केला आहे. ज्याकडे हवाई वाहतूक क्षेत्रातून मोठ्या अश्वासक नजरेने पाहिले जात आहे.
भारतातील एक महत्त्वाची विमान कंपनी एअर इंडिया (Air India) आता आघाडीच्या आणि पूर्ण सेवा वाहक असलेल्या विस्तारा एअरलाईन्स (Vistara Airlines) सोबत काम करणार आहे. दोन्ही कंपन्यांनी एकमेकांशी भागीदारी करार केला आहे. ज्याकडे हवाई वाहतूक क्षेत्रातून मोठ्या अश्वासक नजरेने पाहिले जात आहे. प्रामुख्याने ही भागीदारी टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सचा (Singapore Airlines) संयुक्त उपक्रम असणार आहे. विस्तारासोबतच्या भागीदारीमुळे एअर इंडियाच्या कक्षा विस्तारल्या आहेत. कारण विस्ताराच्या हवाई मार्गांच्या जाळ्यावर एअर इंडियाला देशांतर्गत व्यापाक आणि जागतिक नेटवर्कवर 80 पेक्षा जास्त पॉईंट्सपर्यंत अखंडपणे प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
दोन एअरलाइन्समधील करारामध्ये इंटर एअरलाइन थ्रू चेक-इन (आयएटीसीआय) अंमलबजावणीचा समावेश आहे. ज्यामुळे प्रवाशांना एकाच तिकिटावर सर्व प्रवासी क्षेत्रांसाठी प्रस्थानाच्या पहिल्या टप्प्यावर त्यांचे बोर्डिंग पास मिळू शकतात. तसेच त्यांच्या त्यांच्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत सामानाची तपासणी करता येते.
उल्लेखनिय असे की, एअर इंडिया आणि विस्तारा भारतातील बहुतेक प्रमुख विमानतळांवर एकाच टर्मिनलवर काम करतात. ज्यामुळे आंतरसीमा प्रवास कार्यक्रमांसह प्रवासांसाठी सुखकर प्रवासाचा मार्ग सुलभ होतो.
ट्विट
एअर इंडिया आणि विस्तारा यांनी आपल्या करारादरम्यान, ‘इंटरलाइन कन्सिडरेशन्स ऑन इरिग्युलर ऑपरेशन्स (IROPs)’ किंवा ‘व्यत्यय हस्तांतरण’ कार्यक्षमता प्रणालीदेखील लागू केली आहे. ज्यामुळे विमानोड्डानास होणारा विलंब, विमान उड्डाण रद्द करणे, इतरत्र वळवणे आदी प्रक्रियांना एकमेकांना सहाय्य केले जाील. ज्यामुळे व्यत्यय कमी होऊन प्रवाशांना सहकार्य होईल.
एअर इंडिया कंपनीचे सीईओ आणि एमडी, कॅम्पबेल विल्सन म्हणाले की,विस्तारासोबतच्या आमच्या इंटरलाइन भागीदारीबद्दल आम्ही खूश आहोत. जे आमच्या विस्तारित मार्गाचे जाळे भारत आणि भारताबाहेर प्रवास करणाऱ्या आमच्या संयुक्त ग्राहकांना अधिक कनेक्टिव्हिटी आणि सुविधा प्रदान करेल. आमची समान वचनबद्धता सुरक्षितता आणि ग्राहक सेवेतील उत्कृष्टता या भागीदारीत आघाडीवर आहे.