ऑस्ट्रेलियात दुकानातील सामान चोरी केल्याच्या आरोपात एअर इंडियाचा कॅप्टन रोहित भसीन निलंबित
ऑस्ट्रेलियात दुकानात सामान चोरी केल्याने आरोपात एअर इंडियाचा कॅप्टन रोहित भसीन याच्यावर कंपनीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एअर इंडियाचा (Air India) कॅप्टन रोहित भसीन (Captain Rohit Bhasin) याने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावरील एका दुकानामध्ये सामान चोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या कॅप्टनविरोधात कारवाई करत एअर इंडियाने त्याला निलंबित केले आहे. या कॅप्टनने सिडनी विमानतळावरील एका करमुक्त दुकानातून वॉलेट चोरी केल्याची माहिती एअर इंडिया कंपनीला मिळाली. त्यानंतर कंपनीकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
एअर इंडियाचे प्रवक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन रोहित भसीन यांनी सिडनीच्या ड्युटी फ्री शॉपमधून एक वॉलेट चोरी केले असल्याचा प्राथमिक रिपोर्ट आम्हाला मिळाला. त्यानंतर या प्रकरणाची अधिक तपासणी करण्यात आली आणि कॅप्टनला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ANI ट्विट:
त्याचबरोबर एअर इंडियाच्या प्रवक्तांनी सांगितले की, एअर इंडिया कंपनी झीरो टॉलरेंस पॉलिसीवर काम करते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते.