Air India ची कोरोना व्हायरस लॉकडाऊन नंतरची विमान प्रवासाची तिकीट विक्री सुरू, देशांर्गत प्रवासासाठी 4 मे तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 1 जून पासून उडणार विमानं

मात्र आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 1 जून नंतरची तिकीटं बूक करता येणार आहेत.

Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता भारतामध्ये लॉकडाऊन दरम्यान देशांर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू देशातील कोरोनाची दहशत कमी होत असल्याने एअर इंडियाकडून (Air India) 4 मे पासून देशांर्गत (Domestic Flights) तर 1 जून पासून इंटरनॅशनल फ्लाईट्सची (International Flights) ठराविक ठिकाणची तिकीट बुकिंग सुरू केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये 3 मे पर्यंत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान भारतामध्ये येणारी इंटरनॅशनल फ्लाईट्स 22 मार्चच्या रात्रीपासूनच बंद करण्यात आली होती. त्यावेळेस आठवडाभरासाठी बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची ही सेवा आता 3 मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. SpiceJet कडून Happy At Home Sale ची घोषणा; 939 रूपयांंत विमान प्रवास सोबत रिशेड्युलची मुभा! जाणून घ्या काही खास ऑफर्स

Air India च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 3 मेनंतर आता विमानप्रवासासाठी देशांर्गत काही ठराविक विमानतळावरून प्रवास करण्यासाठी तिकीट विक्री सुरू करण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी 1 जून नंतरची तिकीटं बूक करता येणार आहेत. प्रवाशांनी 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत विमानाचे तिकिट बुकिंग केले असल्यास रिफंड 3 आठवड्यात मिळणार

ANI Tweet

दरम्यान चीनमध्ये कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाल्यानंतर इटली, स्पेनमध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं. त्यामुळे साधारण कोरोनाची केंद्रंस्थान पाहून आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणार्‍या अनेक देशामधील व्हिसा पुढील अमर्यादीत काळासाठी रद्द करण्यात आला आहे. मात्र पुढे लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक परदेशी नागरिक भारतामध्ये अडकून पडले आहेत. तर अनेक विद्यार्थी, पर्यटक परदेशातून मायदेशी येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता एअर इंडियाने तिकीट बुकिंग सुरू केल्याने अनेकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब असेल.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 4 मेनंतर पुढील काही दिवस परदेशी पर्यटक भारतामध्ये राहू शकतात त्यांच्याकडून अधिक शुल्क आकारले जाणार नाही.