Air India आज Tata समूहाकडे हस्तांतरित होण्याची शक्यता

केंद्र सरकार (Central government) कंपनीचा ताबा आज टाटा समूहाकडे देणार असल्याच्या चर्चा आहेत. सुमारे 69 वर्षांनंतर एअर इंडिया समूह पुन्हा एकदा टाटाग्रुपकडे येतो आहे, याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली.

Air India | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बहुचर्चित विमान कंपनी एअर इंडिया Air India आज टाटा ग्रुपकडे (Tata Group) हस्तांतरीत होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार (Central government) कंपनीचा ताबा आज टाटा समूहाकडे देणार असल्याच्या चर्चा आहेत. सुमारे 69 वर्षांनंतर एअर इंडिया समूह पुन्हा एकदा टाटाग्रुपकडे येतो आहे, याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माहिती दिली. सरकारने प्रतिस्पर्धी बोली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आठ ऑक्टोबर रोजी 18,000 कोटी रुपयांना एअर इंडिया कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला विकली होती. ही कंपनी टाटा समूहाच्या होल्डींग कंपनीचा भाग आहे.

अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, सर्व औपचारिकता पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. एयर इंडिया गुरुवारी टाटा समूहाकडे सोपवली जाऊ शकते. दरम्यान, एयरलाईन पायलट यनियन, इंडियन पायलट गिल्ड (IPG) आणि इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशन (ICPA) यांनी इंडियाचेअध्यक्ष एवं प्रबंध निदेशक विक्रम देव दत्त यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. कारण वैमानिकांचे थकीत वेतन आणि सुरु असलेल्या वेतनात कपात केली जाण्याचा आणि वसूली करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा, एअर इंडियाचा प्रवाशांना मोठा दिलासा, प्रवासाची तारीख बदलल्यास पैसे द्यावे नाही लागणार)

दरम्यान, दोन इतर कर्मचारी संघटनांनी आपल्या उड्डांनापूर्वी विमानतळांवर चालक दलाच्या सदस्यांना बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजण्यासाठी कंपनीने 20 जानेवारीच्या आदेशाचा विरोध केला होता. एअर इंडिया कर्मचारी संघ (AIEU) आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोशिएशन (AICCA) ने सोमवारी दत्त यांना पत्र लिहून आदेशाचा विरोध केला. यात आपला निर्णय अमानवीय आणि विमान महानिदेशालयाच्या निर्धारीत नियमांविरोधात असल्याचे म्हटले.