Air India Flight AI171 च्या भीषण अपघातामधून कसा बाहेर पडला Vishwash Kumar Ramesh? पहा त्याने सांगितलेला घटनाक्रम (Watch Video)
Air India Flight AI171 मधील 241 अन्य प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या विमान अपघातावर देशा-परदेशातून शोक व्यक्त केला जात आहे.
Air India Flight AI171 च्या भीषण अपघातामधून Vishwash Kumar Ramesh हा एकमेव बचावलेला प्रवासी आहे. सध्या त्याच्यावर गुजरातच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. 24 तासांपूर्वी झालेल्या या अपघातानंतर समोर आलेली दाहक दृश्य पाहून सारा देश हळहळला होता. टेक ऑफ नंतर काही सेकंदामध्ये विमान हॉस्टेल वर आदळलं आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये विमानातून कोणी वाचू शकेल अशी शक्यता मावळी होती पण Vishwash Kumar Ramesh अपवाद ठरला. तो स्वतः चालत आला. नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी पीएम नरेंद्र मोदींनी त्याची भेट घेत चौकशी केली. दरम्यान यानंतर Vishwash Kumar Ramesh ने डीडी न्यूजशी बोलताना घडल्या प्रकाराची माहिती दिली.
Vishwash Kumar Ramesh हा ब्रिटीश नागरिक आहे. Air India Flight AI171 ने तो देखील लंडनला निघाला होता. त्याने डीडी न्यूज सोबत बोलताना दिलेल्या माहितीमध्ये टेकऑफ नंतर काही सेकंदातच विमानात गडबड असल्याचं आढळलं. विमानात काही लाईट्स पेटल्या आणि काही समजायच्या आतच विमान एका इमारतीला आदळलं. त्यानंतर विमानाचे तुकडे झाले. रमेश खालच्या बाजूला होता. त्याच्या सीट जवळ थोडी गॅप होती. आपण यामधून निघू शकतो असं त्याला जाणवलं म्हणून त्याने पटकन बेल्ट काढला आणि तो तेथून बाहेर पडला. पण आपण निघताना समोर 2 फ्लाईट अटेंडन्ट आणि सहप्रवासी जळत होते.
अपघातानंतर आपण सुरक्षित बाहेर पडू असं वाटलं नव्हतं. आपलाही मृत्यू होईल असं वाटत असताना बाहेर पडलो. स्थानिकांनी मदत करत अॅम्म्ब्युलंस मधून हॉस्पिटलला आणलं. डाव्या हाताला भाजलं आहे पण उत्तम प्रकारे उपचार सुरू असल्याचं Vishwash Kumar Ramesh ने म्हटलं आ हे. Air India Flight AI171 दुर्घटनेत बचावलेल्या Ramesh Vishwaskumar ची पीएम नरेंद्र मोदी यांनी केली हॉस्पिटल मध्ये विचारपूस (Watch Video).
#Breaking अकेले ज़िंदा बचे यात्री विश्वास कुमार रमेश से पहली बातचीत दूरदर्शन ने की है।
"मेरे साइड का डोर टूटा वहाँ कुछ स्पेस भी था मुझे लगा यहां से निकल सकता हूं, वहीं से निकला।"#vishwashkumar #ramesh #ahmedabad #planecrash #airindia pic.twitter.com/eW0ORdkgTG
— Mukesh Mathur (@mukesh1275) June 13, 2025
Air India Flight AI171 मधील 241 अन्य प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या विमान अपघातावर देशा-परदेशातून शोक व्यक्त केला जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2025 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

