Air Canada कडून India-Canada थेट विमानप्रवासाठी Delhi-Toronto Flights सुरू; Covid Tests बंधनकारक

भारताने सध्या 28 देशांसोबत अशा प्रकारे एअर बबल करार केला आहे.

New Delhi International Airport. (Photo Credit: PTI)

कोविड 19 संकटामुळे सार्‍या जगाचा वेग मंदावला आहे. जगभरात कोविड 19 नियंत्रणात येत असल्याची चिन्हं असताना आणि लसीकरणाचा वेग वाढलेला असल्याने आता स्थिती पूर्ववत करण्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान 4 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर कॅनडाच्या (Canada) सर्वात मोठ्या एअरलाईन Air Canada ने भारत- कॅनडा थेट हवाई (India-Canada Direct Flight) प्रवासाला सुरूवात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीमधून (Delhi) ही वाहतूक सुरू होत आहे.

ट्वीटर वर एका युजरला भारतात पुन्हा डिरेक्ट फ्लाईट कधी सुरू होणार यावर प्रतिसाद देताना Air Canada ने ' हो आम्ही या मार्गावर सेवा सुरू करत आहोत' असं लिहलं आहे. दरम्यान कॅनडाला प्रवास करणार्‍यांना किमान 18 तास पूर्वीचा RT-PCR testकिंवा Rapid PCR testचा निगेटीव्ह रिपोर्ट सोबत ठेवावा लागणार आहे. यासाठी दिल्ली एअरपोर्टवर टर्मिनल 3 च्या लाऊंजमध्ये टेस्टिंगची सोय आहे. एअर कॅनडाने दिलेल्या माहितीनुसार, RT-PCR testकिंवा Rapid PCR टेस्ट व्यतिरिक्त इतर टेस्ट ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. तसेच भारतातल्या क्लिनिक मधून इतर टेस्टदेखील ग्राह्य नसतील.

भारतामध्ये दुसर्‍या लाटेचा प्रभाव वाढल्यानंतर एप्रिल 2021 पासूनच Air Canada ने आपली भारतातील सेवा स्थगित केली होती. पण आता WHO ने मान्याता दिलेल्या लसीच्या लाभार्थ्यांसह सार्‍यांनाच टेस्ट करूनच एअर कॅनडा मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. (नक्की वाचा: फिलिपिन्स कडून भारतासह 9 अन्य देशांच्या प्रवासावरील हटवली बंदी).

एअर कॅनडा फ्लाईट सध्या भारत-कॅनडा दरम्यान झालेल्या एअर बबल अंतर्गत चालवण्यात येत आहेत. भारताने सध्या 28 देशांसोबत अशा प्रकारे एअर बबल करार केला आहे.