All India Muslim Personal Law Board: ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये महिलांचा समावेश- AIMPLB

वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) बोर्डाच्या निर्णय घेणार्‍या समित्यांमध्ये अधिक महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Muslim Woman | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुस्लिम महिलांना (Muslim Women) मुख्य निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्याबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (All India Muslim Personal Law Board) राजी झाले आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) बोर्डाच्या निर्णय घेणार्‍या समित्यांमध्ये अधिक महिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने मार्च 2022 मध्ये त्याची महिला शाखा बंद कली होती. त्यानंतर ती पुनर्संचयित करण्यात आली नव्हती. मात्र, आता महिलांचीही मते जाणून घेण्यासाठी या सर्व समित्यांमध्ये महिलांना पुन्हा समाविष्ट करुन घेतले जाणार आहे. समित्यांमधील महिला विंग समाजातील महिलांना इस्लामिक शरियतनुसार महिलांचे हक्क आणि कर्तव्ये याविषयी प्रबोधन करेल.

मुस्लीम समाजातील महागडे विवाह, हुंडा याविरोधात मंडळाच्या महिला सदस्य मोहीम राबवतील. याशिवाय समाजातिक मुलीकडचे कुटुंबीय मुलीला लग्नात हुंडा देण्याऐवजी कुटुंबात आणि संपत्तीत भागिदारी देतील याबाबतही या महिला सामाजिक प्रबोधन करतील असे वृत्तात म्हटले आहे. AIMPLB चे कार्यकारिणी सदस्य डॉ. कासिम रसूल इलियास वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, बोर्डाच्या रविवार पार पडलेल्या बैठकीत महिला शाखा पुनर्संचयित करण्यात आली आहे. AIMPLB चे देशभरात 251 सदस्य आहेत. एकूण सदस्यांमध्ये महिलासदस्यांची संख्या 30 आहे. शिवाय कार्यकारिणीच्या सदस्यांची संख्या 51 आहे. त्यात महिलांची संख्या चार इतकी आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या समित्यांमध्ये असलेले महिलांचे प्रमाण अगदीच कमी म्हणजे नगण्य असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. (हेही वाचा, Muslim Woman Divorce: तलाखसाठी मुस्लिम महिला फक्त कौटुंबीक न्यायालयात जाऊ शकतात- मद्रास उच्च न्यायालय)

डॉ. कासिम रसूल इलियास म्हणाले, यापुढे मंडळाच्या महिला शाकेमध्ये एक निमंत्रक आणि 5 सहसंयोजक अशा मिळून सहाजणी असतील. त्या देशभरातील महिलांना सदस्या बनविण्याचे काम करतील. महिला समित्यांमधील सदस्य (महिला) समाजातील इतर महिलांना आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करुन देतील. त्यासोबतच त्या समाजातील महिलांना इस्लामिक शरियत, इस्लाह-ए-अशारा तफहीम-ए-शरीयत आणि कानून-ए-शरियतबद्दल आदींसदर्भात माहिती देतील.

ट्विट

AIMPLB ने निकाहनामा चार पानांवरून दोन पानांवर आणण्यासाठी काही बदल करुन तो अधिक सोपा करण्यात आल्याचेही डॉ. कासिम यांनी सांगितले. या निकाहम्यामध्ये पती आणि त्याचे विवाहानंतरचे अधिकार यांची पूर्ण महिती देण्यात आली आहे. शिवाय विवाह सोहळा पार पाढताना कोणती काळजी घ्यावी. कोणत्या नियमांचे पालन करावे यांबाबतही मार्गदर्शन देण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif