Herbal Drug BGR-34 मधुमेहासोबतच लठ्ठपणावर प्रभावी; AIIMS study चा दावा
Dr Sanchit Sharma, AIMIL Pharmaceutical चे Executive Director यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्बल बेस्ड आयुर्वेदिक औषधाला समाजामध्ये स्वीकारण्याचं प्रमाण अधिक आहे.
भारतातील प्रतिष्ठित संस्था All India Institute of Medical Sciences (AIIMS)दिल्ली मध्ये एक रिसर्च पेपर जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार BGR-34 हे आयुर्वेदिक ड्रग अॅन्टी डायबेटिक असून सोबतच लठ्ठपणा देखिल कमी करण्यास मदत करत आहे. या औषधामुळे शरीरात मेटॅबॉलिझम सुधारत आहे.
Dr Sudhir Chandra Sarangi या एम्स च्या pharmacology विभागाच्या अॅडिशनल प्रोफेसरच्या नेतृत्त्वाखाली हा रिसर्च करण्यात आला आहे. 3 वर्षाच्या संशोधनानंतर हा निष्कर्ष काढून दावा करण्यात आला आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार BGR-34 हे ड्रग Council for Scientific and Industrial Research (CSIR)च्या संशोधकांनी विकसित केलेल्या अनेक औषधांच्या मदतीने विकसित केले आहे.
BGR-34 स्वतःच किंवा इतर अॅलोपॅथी औषधांसोबत प्रभावी आहे का आणि जर तसे असेल तर कोणत्या स्तरावर हे तपासण्याचे उद्दिष्ट या अभ्यासामध्ये वैज्ञानिकांनी निर्धारित केले होते. त्याचे परिणाम सकारात्मक होते. हर्बल औषध हार्मोनल प्रोफाइलच्या मॉड्युलेशनद्वारे शरीराच्या वजनात लक्षणीय घट करून फास्टिंग ब्लड शूगर कमी करण्यासाठी मदत करत आहे. यासोबतच त्याचे इतर फायदे देखील आहेत.
Dr Sanchit Sharma, AIMIL Pharmaceutical चे Executive Director यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्बल बेस्ड आयुर्वेदिक औषधाला समाजामध्ये स्वीकारण्याचं प्रमाण अधिक आहे. लाईफस्टाईल चेंजेंस मुळे अनेक आजारांना धोका बळावत आहे हा दूर ठेवण्यासाठी आता आयुर्वेदाकडे वळले आहेत.