अहमदाबाद येथील 6 वर्षीय Arham Om Talsania ची मोठी कामगिरी; सर्वात लहान कॅम्प्युटर प्रोग्रामर म्हणून Guinness World Record मध्ये नोंद
अहमदाबाद येथील 6 वर्षांच्या मुलाने आपल्या कामगिरीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. पायथन प्रोग्रॅमिंग लग्वेंजची परीक्षा पास करुन जगातील सर्वात लहान कंम्प्युटर प्रोग्रॅम मधून त्याने विक्रम रचला आहे
अहमदाबाद (Ahmedabad) येथील 6 वर्षांच्या मुलाने आपल्या कामगिरीने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) आपले नाव नोंदवले आहे. पायथन प्रोग्रॅमिंग लग्वेंजची (Python Programming Language) परीक्षा पास करुन जगातील सर्वात लहान कंम्प्युटर प्रोग्रॅमर मधून त्याने विक्रम रचला आहे. अरहम ओम तलसानिया (Arham Om Talsania) असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता दुसरीमध्ये शिकतो. Pearson VUE टेस्ट सेंटरमध्ये त्याने मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन एक्झाम (Microsoft Certification Exam) पास केली आहे.
"माझ्या वडीलांनी मला कोडिंग शिकवले आहे. मी 2 वर्षांचा असल्यापासून टॅबलेट शिकायला सुरुवात केली. 3 वर्षांचा असताना मला आयओएस आणि विंडोज असलेले गॅजेट्स देण्यात आले. नंतर मला कळाले की, माझे वडील पायथनवर काम करतात," असे तलसानिया याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
"पायथनकडून मला माझे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मी छोटे गेम्स क्रिएट करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे कामाचे काही पुरावे मागितले. काही महिन्यानंतर त्यांनी माझ्या कामाला मान्यता दिली आणि मला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट मिळाले," असेही त्याने सांगितले. पुढे तो म्हणाला की, "स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा तलसानिया याचे स्वप्न असून त्याद्वारे त्याला सर्वांना मदत करायची आहे. याबद्दल बोलताना तो सांगतो, मला स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा असून सर्वांना मदत करायची आहे. मला अॅप्स, गेम्स आणि कोडिंगसाठी सिस्टम्स तयार करायचे आहे. तसंच मला गरजूंनाही मदत करण्याची इच्छा आहे."
अरहमचे वडील सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. त्यांनी सांगितले की, "अरहमला कोडिंगमध्ये रस होता आणि त्यामुळेच मी त्याला प्रोग्रॅमिंगचे बेसिक धडे दिले. लहानपणापासूनच त्याला गॅजेट्सची ओढ होती. तो टॅबलेट मध्ये गेम खेळत असे. कोडी सोडवत असे. जेव्हा त्याला व्हिडिओ गेम खेळण्यात रस निर्माण झाला तेव्हा गेम क्रिएट करण्याचा तो विचार करु लागला. तसंच लहानपणापासून त्याने मला कोडिंग करताना पाहिलं आहे," असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, "मी त्याला प्रोग्रॅमिंगचे बेसिक धडे दिले आणि त्यानंतर त्याने स्वत:चे गेम क्रिएट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी असोसिएट म्हणून त्याला ओळख मिळाली. मग आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी देखील अर्ज केला."
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)