Adhar Card Link To election Card: तुम्ही तुमचं निवडणुक ओळखपत्र आधारकार्डला लिंक केलं का? जाणून घ्या सविस्तर प्रक्रीया
किंबहुना तुमच आधार कार्ड निवडणुक कार्डसोबत लिंक धाल्यावर तुम्हाला तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज येईल.
केंद्र सरकारकडून आधार कार्ड निवडणुक ओळखपत्राला लिंक करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. गोपनियतेचं कारण देत काही जणांणी या प्रक्रीयेस विरोध दर्शवला होता. पण आता हे प्रक्रीया करण्यास बंधकारक नसून एच्छीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमच्या वोटर आयडीबरोबर नसेल लिंक करायचं तर तो तुमचा निर्णय आहे. पण तुम्ही ही प्रक्रीया करण्यास ईच्छुक असाल तर तो कसा लिंक करायचा या संबंधित सविस्तर माहिती आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहे. तरी तुम्ही तुमच्या जवळच्या आधारकार्ड नोंदणी केंद्रावर जावून किंवा घरबसल्या तुमच्या मोबाईच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या वोटर आयडीशी कनेक्ट करु शकता. किंबहुना तुमच आधार कार्ड निवडणुक कार्डसोबत लिंक धाल्यावर तुम्हाला तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर मेसेज येईल.
आधार कार्ड निवडणुक ओळखपत्रास लिंक करण्यासाठी जाणून घ्या प्रक्रीया:-
- तुमच्या मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन हे अप डाऊनलोड करा.
- अनरॉडसह आयफोन वापरकर्त्यांसाठी हे अप उपलब्ध आहे.
- हे अप ओपन केल्यानंतर वोटर रेजिस्ट्रेशनवर क्लीक करा
- फॉर्म ६बी वर क्लीक करा
- लेट्स स्टार्टवर क्लीक करा
- त्यानंतर तिकडे तुमचा मोबाईल नंबर टाका
- आता तुम्हाला तुमच्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाका
- ओटीपी टाकल्यावर व्हेरिफाय या ऑप्शनवर क्लीक करा
- त्यानंतर व्हेरिफाय आयडी हे ऑप्शन निवडा
- तिकडे व्हेरिफाय आयडी नंबर टाका
- त्यानंतर तुम्ही कुठल्या राज्यातील रहिवाशी आहे ते टाका महाराष्ट्र
- नंतर प्रोसिड ऑप्सनवर क्लीक करा
- आता तुमचा आधार नंबर टाका
- डन करा आणि कनफॉर्मवर क्लीक करा (हे ही वाचा:- Aadhaar Mitra: UIDAI ने लॉन्च केला नवा चॅटबोट; पहा कशी करणार मदत?)
संपूर्ण प्रक्रीया झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल. तेव्हा तुमचं आधार कार्ड आणि मतदान कार्ड यशस्वीरित्या कनेक्ट झालं असं समजा.