Tata Steel Executive Murder Case: टाटा स्टील कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू, गाझियाबादमधील घटना
या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Tata Steel Executive Murder Case: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये टाटा स्टीलचे नॅसनल बिझनेस हेड विनय त्यागी यांचा ३ मे रोजी हत्या करण्यात आली होती. .या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या चकमकीत आरोपीला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळीस घरी परतत असताना विनय त्यागीवर दोघांन्ही हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्यावर एकाने चाकून भोसकून हत्या केली. त्यात गंभीर जखम झाल्याने ते जमीनीवर पडून राहिले. गंभीर जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करताच, आरोपीचा शोध घेतला. (हेही वाचा- रस्त्यावर चालत असलेल्या महिलेवर बलात्कार, घटना CCTV कैद)
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी नवी दिल्ली येथील रहिवासी होता. ३ मे रोजी टाटा स्टीलचे नॅशनल बिझनेस हेड विनय त्यागी घरी जात होते त्यावेळी अचानक त्यांच्यावर दोघांन्ही हल्ला केला होता. त्यांच्याकडेचे पैसै लुटमार करण्यासाठी आरोपीने विनयचा खून केला. पोटात चाकून भोसकल्याने ते गंभीर अवस्थेत पडून राहिले. आरोपी पैसे घेऊन फरार झाला होता. गंभीर अवस्थेत पाहून एका व्यक्तीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. कुटुंबियांनी विनय यांना नरेंद्र मोहन रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आणि सीसीटीव्ही फुटेज द्वारा आरोपीचा शोध घेतला. अक्की उर्फ दक्ष असं आरोपीचे नाव होतं. पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. परंतु पोलिसांच्या चकमकीत आरोपीला गोळी लागली. गोळी लागल्याने आरोपीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे..