Atma Nirbhar Bharat Economic Package: MGNREGA अंतर्गत रोजगार वाढवण्यासाठी 40 हजार कोटींची तरतूद- अर्थमंत्री निर्मला सीतारमण
MGNREGA अंतर्गत रोजगार वाढवण्यासाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अखेरच्या पत्रकार परिषदेत दिली.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. तसंच त्यासाठी तब्बल 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेज अंतर्गत कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद करण्यात आली याची माहिती अर्थमंत्री मागील 4 दिवसांपासून देत आहेत. आज त्यांची 5 वी आणि अखेरची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. तसंच मनरेगा (MGNREGA) अंतर्गत रोजगार वाढवण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.
स्थलांतरीत कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी या 40 हजार कोटींचा वापर करण्यात येणार आहे. मेनरेगा अंतर्गत या स्थलांतरीत कामगारांना जलसंधारणासारखी कामे उदरनिर्वाहासाठी देण्यात येणार आहेत. यामुळे गावाकडील रोजगार वाढण्यास मदत होईल. परिणामी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. स्थलांतरीत मजूरांना दोन महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी 3500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (कोरोना संकटात इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणारे 12 नवे DTH चॅनेल सुरु होणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमण)
ANI Tweet:
काल आत्मनिर्भर भारत आर्थिक पॅकेज अंतर्गत कोळसा व्यवसाय, खनिजे व्यवसाय, संरक्षण संसाधनांची निर्मिती, एअरस्पेस मॅनेजमेंट, MRO, अवकाश संशोधन क्षेत्र आणि अणू ऊर्जा या क्षेत्रांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या. तसंच त्यापूर्वी MSME सेक्टर, पगारदार वर्ग, शेतकरी, श्रमिक, स्थलांतरीत मजूर यांना या पॅकेजअंतर्गत दिलासा देण्यात आला होता.