झारखंड: जमशेदपूर येथे अँटी करप्शन ब्युरोचा अधिकारी असल्याचे सांगत महिलेकडे पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तीला महिलेने दिला बेदम चोप (Watch Video)
झारखंड येथील जमशेदपूर येथे एका महिलेने अँटी-करप्शन ब्युरोचे ऑफिसर असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीची जोरदार धुलाई केली.
झारखंड (Jharkhand) येथील जमशेदपूर (Jamshedpur) येथे एका महिलेने अँटी-करप्शन ब्युरोचे (Anti-Corruption Bureau) ऑफिसर असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीची जोरदार धुलाई केली आहे. या व्यक्तीने अँटी-करप्शन ब्युरोचा अधिकारी असल्याचे सांगत महिलेकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यावर त्या महिलेने युक्ती करत पैसे घेण्यासाठी त्या व्यक्तीला बोलावले आणि त्यानंतर चप्पलेने त्या व्यक्तीची चांगली पिटाई केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या महिलेने या व्यक्ती विरोधात मँगो पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात मँगो पोलिस स्थानकातील प्रमुख अरुण मेहता यांनी सांगितले की, "कौटुंबिक समस्येवरुन ही व्यक्ती महिलेकडे 50 हजारांची मागणी करत होती. तसंच अँटी करप्शन ब्युरोचा अधिकारी असल्याचेही या व्यक्तीने सांगितले होते. त्याच्याकडे खोटे ओळखपत्र देखील होते."
ANI ट्विट:
या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.