पंजाब: हवाई दलाचे मिग-29 लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
हवाई दलाचे मिग-29 लढाऊ विमान आज सकाळच्या सुमारास पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात कोसळले. मात्र यातील वैमानिकाच्या प्रसंगावधामुळे सुदैवाने ते बचावले असल्याची माहिती IAF ने दिली आहे. ही घटना सकाळी 11 च्या सुमारास घडली. यातील वैमानिकाला दुखापत झाल्याने त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह हवाई दलाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत माहिती देताना स्थानिक लोकांनी सांगितले की, त्यांनी हवेत उडणाऱ्या एका विमानाला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर थोड्याच वेळात ते विमान एका शेतात जाऊन कोसळले. मात्र, हे विमान खाली कोसळण्यापूर्वी या विमानाच्या पायलटने वेळीच विमानाबाहेर उडी घेतली, असेही स्थानिकांनी सांगितले. याचाच अर्थ पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवून विमानाबाहेर उडी घेतल्याने त्याचे प्राण वाचले. Coronavirus Effect: एअर एशिया पुणे-दिल्ली विमानात संशयित कोरोना ग्रस्त असल्याचे कळताच वैमानिकांनी इर्मजन्सी गेटमधून काढला पळ, Watch Video
या दुर्घटनेची माहिती मिळताच हवाई दलाचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही दुर्घनटा नेमकी कशी घडली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.