ओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद

हा चित्तथरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Indian Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

रेल्वे अपघाताच्या कित्येक घटना दरदिवसा आपल्याला ऐकायला मिळतात. यात अनेकदा अनपेक्षितपणे प्रवाशांचा मृत्यू होतो तर कधी प्रवाशी वाचतात. पण रेल्वे अपघात ही नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा उभा राहतो. पण आपल्या मराठीत एक म्हण आहे 'देव तारी त्याला कोण मारी'. तुमचं नशीब बलवत्तर असेल तर तुमचे काहीही वाईट होऊ शकत नाही. असच काहीसं झालयं या रेल्वेप्रवाशाच्या बाबतीत. चालत्या रेल्वेखाली येऊनही हा प्रवासी अंगावर रेल्वे गेल्यानंतर केवळ उभा राहिला नाही तर चक्क आपल्या निर्धारित जागी जाऊन उभा राहिला. हा चित्तथरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ओडिशाच्या झारसुगुड़ा रेल्वे स्थानकात ही घटना घडली आहे. येथे एक प्रवासी चालती ट्रेन पकडत असताना अचानक तो रेल्वेखाली आला. मात्र संपुर्ण ट्रेन त्याच्या अंगावरुन गेल्यानंतर जे चित्र पाहायला मिळाले ते अगदी धक्कादायक होते. पाहा व्हिडिओ...

हे दृश्य बघताच या रेल्वेस्थानकात उभे असलेले रेल्वे प्रवासी त्याच्या मदतीसाठी धावले. तेव्हा पाहतात तर काय रेल्वेखाली आलेला हा प्रवासी रेल्वे गेल्यानंतर न केवळ जागेवर उभा राहिला तर आपल्या निश्चित ठिकाणाच्या दिशेने चालू लागला.

हेही वाचा- रेल्वे रुळांवर बसून PUBG गेम खेळणे जीवावर बेतले, रेल्वेच्या धडकेने दोन तरुणांचा जागीच मृत्यू

ज्याप्रकारे तो प्रवासी रेल्वेखाली आला तेव्हा तो वाचणे शक्यच नाही असे या व्हिडिओवरुन स्पष्ट दिसतेय. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून की काय तो प्रवासी सुदैवाने बचावला.