पंजाब मधील जालंधर येथे COVID-19 Lockdown चे नियम मोडत कारचालकडून पोलिस अधिकाऱ्याची बोनेटवरुन फरफट (Watch Video)
इतकंच नाही आपल्या कारच्या बोनेटवरुन पोलिस अधिकाऱ्याला फरफटवंत नेले. या घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
भारतात कोरोना बाधित रुग्णांची सातत्याने संख्या वाढत असल्याने देश 24 मार्च पासून लॉकडाऊन स्थितीत आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधीही 2 आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन सरकार आणि आरोग्य यंत्रणांकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचेही आवाहन सरकारकडून होत आहे. तरी देखील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशीच एक घटना पंजाब (Punjab) राज्यातील जालंदर (Jalandhar) येथून समोर आली आहे. कार थांबवण्यास सांगण्याऱ्या एका पोलिस अधिकाऱ्यासमोर कारचालकाने चक्क सुसाट कार पळवली. इतकंच नाही आपल्या कारच्या बोनेटवरुन पोलिस अधिकाऱ्याला फरफटवत नेले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मात्र इतर पोलिसांनी कारचालकाचा पाठलाग करत त्याला गाठले आणि चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात तरुणाचा बेजबाबदारपणा स्पष्टपणे दिसत आहे. एएसआय मुलख राज (ASI Mulkh Raj) असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर इर्टीका कारचालकाचे नाव अनमोल मेहमी (Anmol Mehmi) असून ही गाडी त्याचे वडील परमिंदर कुमार (Parminder Kumar) यांच्या मालकीची आहे. पोलिसांना या दोघांनाही अटक केली आहे. (लॉकडाऊनचा नियम मोडल्याने अडवलेल्या महिलेने पोलिसांनाच घेतला चावा; पहा Viral Video)
ANI Tweet:
यापूर्वी देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसंच पोलिस, डॉक्टर्स यांच्यावर हल्ले करणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ले केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा नवा सुधारित कायदा लागू करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या गंभीर काळात पोलिस कर्मचारी, आरोग्य सेवक आपला जीव पणाला लावून केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यामुळे बेजबाबदारपणे वागून त्यांच्यावरील ताण अधिक न वाढता नियमांचे पालन करुन त्यांना सहकार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे.