Fani Cyclone च्या तडाख्यात भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर जन्मलेल्या मुलीचे नाव ठेवले 'फनी'
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
सध्या ओडिशा (Odisha) राज्यात फनी चक्रीवादळाने (Fani Cyclone) धुमाकूळ घातला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या गंभीर वातावरणात एका गर्भवती महिलेने भुवनेश्वर रेल्वे स्थानकानात बाळाला जन्म दिला. ओडिसातील 8 जिल्ह्यांत झालेल्या चक्रीवादळात मुलीचe जन्म झाल्याने पालकांनी त्या मुलीचे नाव 'फनी' असे ठेवले आहे. ('ओडिशा' ला धडकणारं चक्रीवादळ 'फनी' याचं नावं कसं ठरलं? त्याचा नेमका अर्थ काय?)
रेल्वे हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "बाळाचा जन्म 11:00 वाजता झाला. तिच्या जन्माच्या वेळी, चक्रीवादळाने पुरीमध्ये जमीनदोस्त केली होती आणि ओडिशाच्या इतर भागांमध्ये सुमारे 150 किमी / तास वेगाने प्रवेश केला होता. ओडिशात सतर्कतेचा इशारा दिला असताना या 32 वर्षीय महिलेची प्रसुती झाली. बाळ आणि आई दोघीही सुखरुप असल्याचे सांगण्यात आले आहे."
ही महिला रेल्वे कर्मचारी असून ती मॅचस्वर येथील कोच दुरुस्ती वर्कशॉपमध्ये सहाय्यक म्हणून काम करते
ANI ट्विट:
फनी चक्रीवादळाचा फटका ओडिशा राज्याला चांगलाच बसला असून प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. गृह मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.