दोन मुलांची हत्या करून एका व्यक्तीची आत्महत्या; बेरोजगाराला वैतागून केले हे कृत्य ; 9 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

10 Feb, 03:06 (IST)

शालीमार येथील राहत्या घरात दोन मुलांची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीने मेट्रो ट्रेनच्या मार्गावर उडी मारून आत्महत्या केली. बेरोजगारीला वैतागून संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ट्वीट-

 

10 Feb, 02:07 (IST)

डोंगरी येथून दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय तारिक परवीन याला अटक करण्यात आली आहे.

10 Feb, 01:35 (IST)

मनसेच्या महामोर्चासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थापनेबाबत राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांचे ट्वीट करत आभार मानले आहेत.

10 Feb, 01:17 (IST)

कोरोना व्हायरसमुळे जहाजावर अडकलेले 138 भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोरोनामुळे समुद्रात 3 हजार 700 प्रवासी अडकले होते त्यापैकी 60 पेक्षा अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. 

10 Feb, 24:45 (IST)

दिल्ली येथे विधानसभा निवडणूकीसाठी 62.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

10 Feb, 24:24 (IST)

घुसखोरांच्या विरोधातील मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे पक्षाचे नेते अभिजीत पानसे यांनी स्पष्ट केले आहे. 

10 Feb, 24:08 (IST)

वृक्षतोडीची परवानगी देण्यात तेलगंणा अव्वल असल्याची बाब समोर आली आहे. 

09 Feb, 23:58 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. मात्र कोश्यारी यांची नेमक्या कोणत्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

09 Feb, 23:40 (IST)

मला हिंदुत्व साध्य करण्याची गरज नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या महामोर्चावर खोचक टीका केली आहे. 

 

09 Feb, 23:31 (IST)

23 लाख 86 हजार रुपये असलेल्या 2 हजार रुपयांच्या बनावटी नोटा पाकिस्तान आणि दुबई येथून मुंबईत आणल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

 

 

09 Feb, 23:16 (IST)

जळगाव येथे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात बसची ट्रकला धडक लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

09 Feb, 22:52 (IST)

प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडेने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आणि त्यांच्या सहकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. 

 

09 Feb, 22:15 (IST)

आमचा देश म्हणजे धर्मशाळा नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सीएएला समर्थन दर्शवलं आहे. मुस्लिमांनी सीएएविरोधात काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागलेला नाही, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. परदेशात घुसखोरांना थारा दिला जात नाही. मग भारताने काय माणुसकीचा ठेका घेतला आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

09 Feb, 22:10 (IST)

राज ठाकरे यांनी सीएएला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. केंद्रावर टीका केली की, भाजपच्या विरोधात आणि त्यांच्या एखाद्या निर्णयाला पाठिंबा दिला की मनसे त्यांच्या बाजूने हा काय प्रकार आहे, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.  

09 Feb, 22:04 (IST)

देशातील CAA, NRC वरुन राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हकलले पाहिजे असल्याचे विधान केले आहे.

09 Feb, 21:59 (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला आझाद मैदानात सुरुवात झाली आहे. 

09 Feb, 21:26 (IST)

मनसेच्या महामोर्चाला राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे. या मोर्चाला मनसैनिकांची प्रचंड गर्दी केली आहे. दक्षिण मुंबईत सर्वत्र भगवे वातावरण झाले आहे.

 

09 Feb, 20:51 (IST)

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे हिंदू जिमखाना ते मेट्रो सिनेमापर्यंत कार्यकर्त्यांसोबत पायी चालणार आहेत. 

 

09 Feb, 20:44 (IST)

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली आहे.

 

09 Feb, 20:23 (IST)

हिंदू जिमखाना येथून निघणारा मनसेच्या मोर्चाचा आझाद मैदानात संपणार आहे. याठिकाणी राज ठाकरे मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी आझाद मैदानात व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. 

 

Read more


आजचा दिवस (9 फेब्रुवारी) काही विशेष घडामोडींमुळे महत्त्वाचा ठरणार आहे. आज पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामोर्चा काढण्यात येणाऱ्या आहे. या मोर्चात अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबईतील हिंदू जिमखान्यापासून सुरु होणारा मोर्चा आझाद मैदानावर येऊन धडकणार आहे. तसेच पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होणार आहे. त्यामुळे या सांगता सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच चीनमध्ये कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिल्ली प्रवासात उलट्या झालेल्या चिनी नागरिकासह तिघांची शनिवारी तपासणी करण्यात आली. सुदैवाने ही चाचणी 'निगेटिव्ह' आल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) स्पष्ट केले आहे. सध्या पुण्यासह राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

तसेच शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता दिल्लीमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सरासरी 58 टक्के मतदान झाले. दिल्ली निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागणार आहे. परंतु, सर्व मतदानोत्तर चाचण्यांतून पुन्हा आम आदमी पक्षालाच बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now