Hyderabad Fire: हैदराबाद इमारतीच्या आगीत 9 जणांचा मृत्यू, कार दुरुस्त करताना ठिणगीमुळे घडली दुर्घटना
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, केमिकलने आग लागली होती त्यामुळे ती पाण्याने विझली नाही.
हैदराबादमधील नामपल्ली येथे सोमवारी एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून बचाव आणि कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. वरच्या मजल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना खिडक्यांमधून बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी 10 जणांना बेशुद्ध अवस्थेत इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे. (हेही वाचा - Punjab Accident: लुधियाणामध्ये 100 वाहने एकमेकांना धडकल्या, भीषण अपघातात एकाच मृत्यू)
पाहा व्हिडिओ -
रसायने ठेवलेल्या तळमजल्यावर आग लागली आणि नंतर इतर मजल्यांवर पसरली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग कारच्या दुरुस्तीदरम्यान ठिणगीमुळे लागली होती. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, केमिकलने आग लागली होती त्यामुळे ती पाण्याने विझली नाही. सकाळी 9.35 च्या सुमारास अग्निशमन दलाला अलर्ट करण्यात आले आणि अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
या आगीचे आगीचे कारण आणि नुकसानीचे प्रमाण अद्याप अधिकृतपणे समजू शकलेले नाही. याआधी आज हैदराबादमधील कोठापेट येथील ललिता हॉस्पिटलजवळील एका दुकानाला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.