Coronavirus: दिल्लीत 3 कॅन्सर रुग्णांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह ; 9 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झुंजत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रभाव भारत देशात वाढताना दिसत आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या 5000 च्या पार गेली आहे. तर महाराष्ट्र राज्यात हा आकडा 1000 च्या वर आहे.
कारागृहात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी COVID-19 बाधित क्षेत्रातील कारागृहे तातडीने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
भारतात महाराष्ट्र पाठोपाठ नवी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. नवी दिल्लीत 51 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची संख्या 720 वर गेली असल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे. यात 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून 25 रुग्णांचा डिस्चार्ज मिळाला आहे.
मुंबईसारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या शहराता दाट लोकवस्तीत लोक छोट्याशा 10X10 च्या खोलील 15 किंवा त्याहून अधिक लोक दाटीवाटीने राहत असतात. अशा लोकांना Social Distancing साठी शाळांमध्ये हलविण्यात येणार असल्याची योजना आखत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पुण्यात कोरोना बाधित मृतांची रीघ सुरुच आहे. नवीन रिपोर्टनुसार, पुण्यात 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 24 वर गेला आहे. ज्यातील 6 जणांचा आज मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत 79 नवे COVID-19 बाधित रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 775 झाली आहे. तर नव्या 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मृतांची एकूण संख्या 54 वर गेली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात 24X7 ऑनड्युटी असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केरळ पोलिस विभागाने 'निर्जंतुकीकरण बस' सुरु केली आहे. यात ऑनड्युटी असणा-या पोलिसांना निर्जंतुकीकरण करता येईल. ़
केरळमध्ये 12 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे केरळमधील कोरोना बाधितांची संख्या 357 वर गेली असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झुंजत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रभाव भारत देशातही वाढताना दिसत आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या 5000 च्या पार गेली आहे. दरम्यान इटली, स्पेन यांसह इतर युरोपीयन राष्ट्रांमध्ये आणि अमेरिकेत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाने तेथे मृत्यूचे तांडव घातले आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनाने तब्बल 2000 लोकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Hydroxychloroquine हे औषध पुरवल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 1000 च्या वर गेला आहे. दिवसागणित वाढत जाणारी कोरोना बाधितांची संख्या नक्कीच काळजी वाढवत असेल. मात्र तरी देखील काळजी करु नका, काळजी घ्या असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. दरम्यान आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वस्त केलं आहे. राज्यात फिव्हर क्लिनिक्स, कोरोना बाधितांसाठी विशेष हॉस्पिटल्स अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण राज्यात सापडून 4 आठवडे पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप आपण तिसरा टप्पा गाठला नाही. ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे. दरम्यान मृत्यूदर वाढलेला दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी तंदुरुस्त राहण्याकडे भर देणे आवश्यक आहे. तसंच घराबाहेर पडताना मास्क लावणे आता बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून न फिरणाऱ्यांवर BMC कडून कारवाई करण्यात येणार आहे. तसंच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचा पर्याय राज्य सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जगभरातील कोरोना व्हायरसची भयंकर परिस्थिती पाहता कोरोनावर मात करण्यासाठी आपण सरकारच्या प्रयत्नांना सामूहिक सहकार्याची साथ देऊया.