ठाणे: अंबरनाथमधील मोरीवली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला आग ; 8 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

दिल्ली मध्ये आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सत्ता पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न प्रचार सभेवेळी करण्यात आला.

09 Feb, 04:36 (IST)

ठाणे शहरातील अंबरनाथमधील मोरीवली औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. ट्वीट-

 

09 Feb, 03:13 (IST)

सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार असून भाजपाला 20 जागा मिळणार नाही आणि दिल्लीत केजरीवाल यांचेही सरकार बनवणार नाही. एक्झिट पोल जे आकडेवारी दर्शवत आहे त्यापेक्षा काँग्रेसला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे, असे कॉंग्रेस नेते सुभाष चोप्रा म्हणाले आहेत.

एएनआयचे ट्वीट-

 

 

09 Feb, 02:09 (IST)

महाराष्ट्रात भाजप ऑपरेशन लोटस राबवून पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चा असताना कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एक वेगळाच दावा केला आहे. ऑपरेशन लोटस सोडाच उलट भाजप चे नेतेच ठाकरे सरकारच्या संपर्कात असल्याचे नवाब मलिक यांनी म्हंटले आहे.

09 Feb, 01:43 (IST)

वांद्रे येथे शिव संग्राम वर्धापन दिनी बोलत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विश्वासघातकी म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करत उत्तर देऊ असा इशारा दिला आहे तसेच इतक्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका अन्यथा जनता आणि आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असेही फडणवीस यांनी म्हंटले आहे. 

 

09 Feb, 01:38 (IST)

देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारमध्ये जाणार का या प्रश्नावर उत्तर देताना आज माजी मुख्यमंत्र्यानी मी  पळून जाणाऱ्यातील नाही, जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार स्थापन करत नाही तोपर्यंत राज्य सोडून जाणार नाही असे म्हंटले आहे, वांद्रे येथे शिव संग्राम संस्थपन दिनी फडणवीस बोलत  होते.

09 Feb, 01:10 (IST)

नरेंद्र मोदी यांना देशातील युवक दांड्याने मारतील असे म्हणणाऱ्या राहुल गांधी यांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. जर का राहुल गांधी मोदींना दंडा मारतील तर आम्ही त्यांना अंडा मारू अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर अशी विधाने केल्यानेच राहुल गांधी अमेठी हरले आहेत, ते काँग्रेसला पोकळ करत आहेत आणि आता हळूहळू नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत असेही आठवले म्हणाले.

09 Feb, 24:27 (IST)

इंडिया टुडे एक्सिस एक्झिट पोल निकाल 

 

आम आदमी पक्ष (AAP) - 44 जागा

 

भारतीय जनात पक्ष (BJP) - 26 जागा

 

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष - (Congress) - 0 जागा

09 Feb, 24:19 (IST)

सध्या दिल्लीमध्ये आपचे सरकार असून दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 मध्येही आम आदमी पक्षच बाजी मारणार असे राजकीय वातावरण निर्माण झाले आहेत. 

जागा- 70

आप: 49- 63

भाजप: 5-19

काँग्रेस: 0-04

वरील माहिती एपीबी माझाच्या एक्झिट पोलनुसार देण्यात आली आहे. 

08 Feb, 23:51 (IST)

पंजाब : तरनतारन येथे कीर्तन कार्यक्रमात फटाके घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीमध्ये मोठा स्फोट झाला. यात कमीतकमी तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

08 Feb, 23:37 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा अवधी समाप्त झाला असून. प्राप्त माहितीनुसार सहा वाजेपर्यंत 57 टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. 

 

08 Feb, 22:48 (IST)

चितळे समुहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 

08 Feb, 22:00 (IST)

 दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडत असून  दुपारी 4 वाजेपर्यंत 42.70 टक्के मतदान पार पडले आहे. 

08 Feb, 21:24 (IST)

पंजाब येथे तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याने  बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

08 Feb, 20:58 (IST)

पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन आणि कन्नडचे शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'कृष्णकुंज'वर मनसेत प्रवेश केला आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सुहास दशरथे आणि शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत अधिकृत प्रवेश केला आहे. 

08 Feb, 20:16 (IST)

अमरावती येथे कार आणि ट्रकच्या धडकेत परिवारातील तिघांचा मृत्यू  झाल्याची दुर्घटना घडली आहे. 

08 Feb, 19:48 (IST)

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह कन्नडचे माजी आमदार प्रकाश महानजी यांनी सुद्धा मनसेत प्रवेश केला आहे. 

08 Feb, 19:25 (IST)

शिर्डी येथे रस्त्यांंवरील खड्ड्यांमुळे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

08 Feb, 19:02 (IST)

 

नागपूर येथे तृतीय पंथीयांच्या दोन गटात  बिदागी मागण्याच्या जागेवरुन तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. 

 

08 Feb, 18:46 (IST)

कन्नडचे माजी आमदार  प्रकाश महानजी यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला आहे. 

 

08 Feb, 18:37 (IST)

बेळगाव-बोगूर गावाजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. उस तोडणी कामगारांना हा ट्रक घेऊन जात होता त्यावेळी तो उलटून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more


दिल्ली मध्ये आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सत्ता पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न प्रचार सभेवेळी करण्यात आला. त्यामुळे आता दिल्लीत कोणाचे सरकार येणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. याच पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या 200 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर आंदोलकांनी अनधिकृतपणे रस्ता रोको केल्याचे तक्रारीमध्ये महापालिका सहाय्यक आयुक्त अल्का ससाणे यांनी म्हटले आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

मुंबईत किमान तापमानाचा पारा 14अंशांपर्यंत घसरला आहे. तसेच कमाल तापमानातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निफाड येथे तापमानाचा पार 18 अंशावर पोहचला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now