विदेशातून आणलेले मास्क धुवून विक्री प्रकरणी भिवंडी, नारपोली येथे गुन्हा दाखल. इमरान शेख नावाच्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. उघड्यावर फेकून दिलेले सर्व मास्क एकत्र करून त्यांची जैव वैद्यकीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ते पॉल्युशन बोर्डच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सध्या महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे सव्वादोन लाख अधिकारी-कर्मचारी आहेत. त्यापैकी 28 हजार म्हणजेच 15 टक्क्याच्या आसपास महिला कर्मचारी आहेत. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हे प्रमाण 15 टक्क्यांहून 30 टक्क्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 904 विमानांमधील 1 लाख 9 हजार 118 प्रवाशांची तपासणी झाली आहे. कोरोना व्हायरस संबंधित माहितीसाठी राज्य नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 020- 26127394, टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना आज ईडीकडून पहाटेच्या वेळेस अटक करण्यात आली. त्यानंतर परिवाराला ईडीने नोटिस सुद्धा पाठवली. तर आता राणा कपूर यांची मुलगी रोशनी ही मुंबई सोडून लंडन येथे जाण्यासाठी निघाली असता तिला विमानतळावर अडवण्यात आले आहे.
तेलंगणमधील एका खासगी शाळेत 11 विद्यार्थिनींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा नराधम शिक्षक विद्यार्थिंनींवर बलात्कार करण्यापूर्वी विद्यार्थिनींना दारू पाजत होता.
महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा 85 धावांनी पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली आहे.
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुन्हा एक कोरोना संशयित रुग्ण दाखल झाला आहे. हा रुग्ण न्यूझीलंडहून भारतात परतला होता. हा रुग्ण मूळचा नवी मुंबईच्या वाशी उपनगरातील रहिवासी आहे. त्याला सर्दी आणि घसा दुःखीचा त्रास जाणवत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिलिंद एकबोटे राज ठाकरे यांच्या भेटीला, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 24 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीतर्फे हे निमंत्रण मिलिंद एकबोटे यांना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत फेसबुकद्वारे महिलांशी संवाद साधणार आहे. तसेच राज्यातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरवही करणार आहे.
केरळामध्ये कोरोना व्हायरची लागण झालेले नवे 5 रुग्ण आढळले आहेत. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे भारतातील करोना रग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा उद्या म्हणजेच सोमवारी वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच सोमवारी नवी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात मनसेकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
आज संपूर्ण जगभरात महिला दिन साजरा होत आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे आज गुगलनेही डूडलच्या माध्यमातून महिलांसाठी एक व्हिडिओ समर्पित केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षेत्रातील महिला दाखवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आज महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. आज मुंबईतील तीनही मार्गावर मेगाब्लॉग नसणार आहे. परंतु, मध्य रेल्वेने ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेकडून वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान आज रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील मुख्य आणि हार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभरात कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
तसेच येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 30 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर त्यांची शनिवारी दिवसभर चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर कपूर यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता कपूर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)