गोव्यात एक COVID-19 रुग्ण झाला बरा, राज्यात कोरोना बाधितांची संख्या 6 वर; 8 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

09 Apr, 04:49 (IST)

गोव्यात 7 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातील एक रुग्ण बरा झाला आहे. मात्र त्याला पुढील 14 दिवसांसाठी विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सद्य स्थितीत गोव्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 वर आली आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

09 Apr, 04:15 (IST)

नवी दिल्लीत 93 नव्या रुग्णांसह दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 669 वर जाऊन पोहोचली आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली आहे.

09 Apr, 03:49 (IST)

पुण्यात आज आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता मृतांची संख्या 18 वर पोहचली असून, त्यापैकी 10 जणांचा मृत्यू आज झाला आहे: पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

09 Apr, 03:26 (IST)

राज्यातील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्यक्तींपैकी 25 जण कोरोन व्हायरस बाधित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. यामध्ये लातूर 8, बुलढाणा 6, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर प्रत्येकी 2, रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, वाशीम येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.

09 Apr, 02:52 (IST)

उत्तराखंडात 2 नवे कोरोना बाधित आढळले असून येथील रुग्णांची संख्या आता 35 वर गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

09 Apr, 02:29 (IST)

शिमल्यामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्याचा वापर करून रस्त्यांचे निर्जतुकिकरण  करण्यात आले आहे. एएनआयने या घटनेचे फोटो शेअर केले आहेत.

 

 

09 Apr, 01:54 (IST)

दिल्लीत मास्क लावणे बंधनकारक करण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. यात तीन लेअर असलेला कपडा किंवा रुमाल तोंडाला बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रात मुंबई तसेच पुण्यातील नागरिकांना तोंडावर मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

09 Apr, 01:20 (IST)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 14 एप्रिल रोजी सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.


 

09 Apr, 01:16 (IST)

यवतमाळमध्ये 8 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

09 Apr, 24:45 (IST)

कोरोना व्हायरसच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे देशातील प्रयोगशाळांना दिले आहेत. यासंदर्भात केंद्र तसेच राज्य सरकार निर्देश जारी करेल, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. देशातील नागरिकांची मोफत कोरोना चाचणी करण्यात यावी, यासाठी वकिल शंशाक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

 

09 Apr, 24:29 (IST)

भारतात कोरोना बाधितांची संख्या 5274 वर पोहचली आहे. तर 411 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

08 Apr, 23:41 (IST)

पुण्यात आज 3 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्य पावलेल्यांचा आकडा 16 वर पोहचला आहे.

08 Apr, 23:19 (IST)

मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे महानगर प्रदेशातील कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश करतांना मास्क घालणे बंधनकारक असल्याचा आदेश महाराष्ट्र सरकारने दिला आहे.

 

 

08 Apr, 23:00 (IST)

मला 5 मिनिटं उभं राहून सन्मान देण्यापेक्षा एखाद्या गरजू कुटुंबांची मदत करा, असं आवाहन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलं आहे. माझ्या असं लक्षात आलं आहे की, काही लोकांना 5 मिनिटं उभं राहून माझा सन्मान करायचा आहे. परंतु, मला हे एक प्रकारचं शडयंत्र वाटतं आहे. त्यामुळे तुम्हाला जर मदत करायची असेल तर या संकटकाळात एखाद्या गरजू कुटुंबाची जबाबदारी घ्या, असंही मोदींनी म्हटलं आहे.

 

08 Apr, 22:35 (IST)

नागरिकांना रेशनधान्य मिळण्यात येत असलेल्या अडचणी, कोरोना लढाईतील अग्रदूत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज, त्यांना पूर्ण वेतन अशा विविध मागण्यांसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून बडतर्फी करण्यात यावी असेही निवेदन या नेत्यांनी दिले आहे.

08 Apr, 22:35 (IST)

नागरिकांना रेशनधान्य मिळण्यात येत असलेल्या अडचणी, कोरोना लढाईतील अग्रदूत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज, त्यांना पूर्ण वेतन अशा विविध मागण्यांसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार या भाजप नेत्यांनी  आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून बडतर्फी करण्यात यावी असेही निवेदन या नेत्यांनी दिले आहे.

08 Apr, 22:21 (IST)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितळे उद्योग समुहाकडून  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी तर पीएम केअर्स फंडासाठी 50 लाख रूपये देण्यात आहे.आज संबंधित रक्कमेचा चेक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला. 

 

08 Apr, 21:59 (IST)

ठाण्यामध्ये मारहाण झालेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकांकडून मारहाण झालेल्या पीडित युवकाला विचारपूस करण्यासाठी निघालेल्या खासदार किरीट सोमय्या यांना अटक करणे म्हणजे मोघलाई चालवण्यासारखाच प्रकार आहे अशा शब्दात भाजप आमदार राम कदम यांनी निषेध नोंदवला आहे.

08 Apr, 21:38 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 एप्रिल रोजी देशभरातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद

08 Apr, 21:35 (IST)

Coronavirus: केंद्रीय आरोग्य मंत्रालय पतत्रकार परिषद पाहा लाईव्ह

Read more


जगभरावरील भीषण संकट म्ह्णून सिद्ध झालेल्या कोरोना व्हायरसची आता भारतात 4789 जणांना लागण झाली आहे, देशात सद्य घडीला 4312 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून 124 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे, तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 353 इतकी आहे. देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र राज्याला बसला आहे. मागील 12 तासात राज्यातील 150 नव्या कोरोनाबाधित प्रकरणाच्या सहित रुग्णांची संख्या ही 1018 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी आहे.

दुसरीकडे आज लॉक डाऊन 15 वा दिवस आहे, भारतामध्ये कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान देशातील स्थितीपाहून हा लॉकडाऊन वाढवला जाणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात तर हा लॉक डाऊन वाढवला जाईलच याचे संकेत काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान आज चैत्र पौर्णिमेच्या तिथीवर हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेछा दिल्या आहेत. यंदा कोरोनाचे संकट असल्याने भाविकांनी घरीच हनुमानाचे पूजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now