7th Pay Commission DA Hike Update: नवरात्रीच्या होणार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीची घोषणा? जाणून घ्या महत्वाचे अपडेट

जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात डीए वाढीची भेट मिळू शकेल. यावेळीही त्यांचा महागाई भत्ता दसऱ्यापर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे.

Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

केंद्रीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची (DA Hike) प्रतीक्षा लांबत चालली आहे. आता लवकरच ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत. नवरात्री आणि दिवाळीदरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे. महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना तर महागाई सवलत (DR) केंद्रीय पेन्शनधारकांना दिली जाते.

सरकार या वाढीची घोषणा केव्हाही करू शकते मात्र, ही वाढ 1 जुलै 2023 पासून प्रभावी मानली जाईल. वृत्तानुसार, केंद्र सरकार डीएमध्ये चार टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. मात्र, हे आकडेही वाढू शकतात.

कधी होणार डीए वाढीची घोषणा?

सरकार सहसा दसऱ्याच्या आसपास महागाई भत्ता जाहीर करते. जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात डीए वाढीची भेट मिळू शकेल. यावेळीही त्यांचा महागाई भत्ता दसऱ्यापर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नाही. हा भत्ता वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी वाढवला जाणार आहे.

बोनस मिळण्याची शक्यता

दुसरीकडे केंद्रातील इतर विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीदेखील एक आनंदाची बातमी आली आहे. महागाई भत्त्याव्यतिरिक्त त्यांना बोनसची भेटही मिळणार आहे. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या आसपास उत्पादकता लिंक्ड बोनस (PLB) दिला जातो. यामध्ये तुम्हाला 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस मिळेल. (हेही वाचा: RBI Monetary Policy Update: आरबीआय चं पतधोरण जाहीर; Repo Rate 6.50% वर कायम)

किती होणार वाढ?

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी महागाई भत्ता वाढवते. सध्या केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 टक्के महागाई भत्ता देते. आताच्या या वाढीनंतर तो 46 टक्के होईल. केंद्र सरकार जुलै आणि जानेवारीमध्ये डीएमध्ये सुधारणा करते. या वर्षी मार्च महिन्यातही सरकारने डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती, त्यामुळे ती 38 वरून 42 टक्के झाली. डीएमधील ही वाढ जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली होती.