7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 8 हजार रुपयांची वाढ होणार, मोदी सरकारचा निर्णय

7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 8 हजार रुपयांची वाढ होणार, मोदी सरकारचा निर्णय

7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 8 हजार रुपयांची वाढ होणार, मोदी सरकारचा निर्णय
Cash | (Archived, edited, representative images) (Photo Credits : IANS)

जर तुम्हीसुद्धा केंद्रीय कर्मचारी असून नोकरी करत असल्यास तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण मोदी सरकार यंदाच्या बजेट 2020-21 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर आणि किमान वेतनात वाढ करणार आहे. सरकार तर्फे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वाढीव वेतन आणि भत्त्या बाबत वेगळा मुद्दा मांडण्यात येणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर आणि किमान वेतन वाढ बाबत एक बैठक पार पडली. त्यानुसार आता लवकरच आता याबाबत निर्णय जाहीर होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांनी फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी करत आहेत. यापूर्वी असे सांगण्यात आले होते की, 2019 पूर्वी फिटमेंट फॅक्टरच्या टक्क्यांत बदल करणार आहे. मात्र असे झाले नसल्याचे दिसून आले. तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. रिपोर्ट्सनुसार बजेट मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांनी 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत त्यांचा पगार 18 हजार ते 26 हजार रुपयापर्यंत करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.(7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगानुसार 'हे' 4 महत्वाचे बदल होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा होणार फायदा)

सध्या 5 वर्षांपेक्षा अधिक काळ सरकारी सेवेमध्ये असणार्‍या केंद्रीय कर्मचार्‍यांना त्यांची ग्रॅज्युटीची रक्कम टॅक्स फ़्री मिळणार आहे. Gratuity Act, 1972 नुसार फॅक्टरी, खाण, ऑईल फिल्ड्स, बंदर,प्लॅटेशंस, रेल्वे कंपनी, शॉप्स येथील कर्मचार्‍यांना ग्रॅज्युटी दिली जाते.Payment of Gratuity Bill in 2017 मध्ये सरकारने अमेंटमेट केलं आहे. त्यानुसार 20 लाखाची ग्रॅज्युटी रक्कम करमुक्त करण्यात आली आहे. मार्च 2018 मध्ये हे विधेयक लोकसभा आणि नंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे अंमलात आणण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2020 12:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).