रेल्वेचं तिकीट रद्द करताना 78 वर्षीय व्यक्तीची फसवणूक; सायबर क्राईम हल्ल्यात 4 लाख गमावले

4 वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन मधून सुमारे 4 लाख रूपये काढण्यात आले.

Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

78 वर्षीय व्यक्तीने रेल्वेचं तिकीट रद्द करताना सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकून तब्बल 4 लाख गमावले आहेत. आयआरसीटीसी प्रमाणे बनवलेले फेक पोर्टल द्वारा एका वयोवृद्धाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. M Mohammed Bashir असं त्या व्यक्तीचं नाव असून तो केरळचा रहिवासी आहे. Kozhikode Vandipetta मधून रेल्वेचं तिकीट ते रद्द करत होते. त्यांच्या प्रवासाच्या कार्यक्रमात बदल झाल्याने ते तिकीट रद्द करत होते. त्यावेळी त्यांना रेल्वे अधिकारी बोलत असल्याचं सांगत एकाने फोन केला. त्याने इंग्रजी आणि हिंदी मध्ये अस्खलित संवाद साधला सोबतच M Mohammed Bashir यांच्याकडून 'Rest Desk' अ‍ॅपही डाऊनलोड करून घेतलं.

बशीरच्या माहितीनुसार, 'Rest Desk' app स्मार्टफोन वर कसं डाऊनलोड करायचं याची सारी माहिती त्या बनावट रेल्वे अधिकार्‍याने दिली. फसवणूक करणार्‍या व्यक्तीला बशीरच्या मोबाइल डिव्हाइसवर विना अडथळा प्रवेश मिळाला. काही वेळातच त्याला आपल्या सेव्हिंग़ अकाऊंट मधून पैसे गेल्याचं समजलं. नंतर त्याने बॅंकेत धाव घेताच एफडी मधून 4 लाख गेल्याचं समोर आलं.

पोलिसांच्या दाव्यानुसार, फसवणूक करणार्‍याने 3 वेगवेगळे नंबर वापरून बशीरला कॉल केला. पहिल्यांदा जेव्हा व्यवहार झाला तेव्हा त्यांनी बॅंकेला हा प्रकार सांगण्यापासून रोखले. नंतर मात्र त्याने फोन फॉरमॅट केला आणि घडला प्रकार सायबर सेलला सांगितला.

दरम्यान Rest Desk या अ‍ॅप मुळे फसवणूक करणार्‍याला बशिरच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस मिळाला. 4 वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन मधून सुमारे 4 लाख रूपये काढण्यात आले. पोलिसांच्या अंदाजानुसार फसवणूक केलेली व्यक्ती बिहार, बंगाल प्रांतातील आहे. फेक अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला पुन्हा आयआरसीटीसी कडून देण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif