असाम येथे आज आणखी 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 7 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

08 Nov, 05:19 (IST)

असाम येथे आज आणखी 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 8 हजार 637 वर पोहचली आहे. यापैकी 940 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 936 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 6 हजार 758 जणांवर उपचार सुरु आहेत. ट्वीट-

 

08 Nov, 03:58 (IST)

अमेरिकेत सत्तांतर करणाऱ्या निकालानंतर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण जागतिक पर्यावरण कराराचे पालन कराल अशी आपक्षा आहे. असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

08 Nov, 03:52 (IST)

अमेरिकेच्याराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर डेमोक्रेट्स पक्षाचे जो बायडन विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी अमेरिकी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

08 Nov, 03:25 (IST)

उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील मंगलाौर भागात आज एका मिठाईच्या दुकानात  एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्वीट-

 

08 Nov, 02:56 (IST)

मी ही निवडणूक बरीचशी जिंकली, असा आशायाचे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी केली आहे. ट्विट-

 

08 Nov, 02:13 (IST)

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना खंडणीसंदर्भात अज्ञात व्यक्तीकडून SMS पाठवण्यात आला आहे.

08 Nov, 02:06 (IST)

राजस्थान येथे आज कोरोनाचे आणखी 1841 रुग्ण आढळले असून 13 जणांचा बळी गेला आहे.

08 Nov, 01:54 (IST)

हिमालच प्रदेशातील पोलिसांकडून 3.85 किलोग्रॅमचे Cannabis जप्त करण्यात आले आहे.

08 Nov, 01:43 (IST)

उत्तर प्रदेशात 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

08 Nov, 01:33 (IST)

सांताक्रुज येथून शस्रांची तस्करी करणाऱ्या दोन जणांचा अटक करण्यात आली आहे.

08 Nov, 01:22 (IST)

मुंबईत आज कोरोनाचे आणखी 576 रुग्ण आढळले असून 23 जणांचा बळी गेला आहे.

08 Nov, 01:10 (IST)

जालना जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांना यंदाच्या वर्षात अतिवृष्टीमुळे जबरदस्त फटका बसला आहे.

08 Nov, 24:57 (IST)

दिल्लीतील सरदार बाजार मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

08 Nov, 24:44 (IST)

हिमाचल प्रदेशातील 92 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

08 Nov, 24:33 (IST)

लुधियाना येथून स्पेशल टास्क फोर्सकडून चार जणांकडून 5.39 किलोचे हिरोइन जप्त करण्यात आले आहे.

08 Nov, 24:19 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 3959 रुग्ण आढळले असून 150 जणांचा आज बळी गेला आहे.

08 Nov, 24:08 (IST)

जम्मू-कश्मीर येथे  पाकिस्तानकडून पुंछ येथे शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

07 Nov, 23:54 (IST)

बिहार विधानसभा निवडणूकीसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55.22 टक्के मतदान पूर्ण झाले.

07 Nov, 23:34 (IST)

उत्तराखंड येथे नदीत कार कोसळून जणांचा बळी तर एकजण जखमी झाला आहे.

07 Nov, 23:03 (IST)

आँध्र प्रदेशात गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 2367 रुग्ण आढळले आहेत.

Read more


कोरोना व्हायरस महामारीच्या (Coronavirus Pandemic) दरम्यान विधानसभेच्या निवडणूका ठेवणारे बिहार (Bihar Assembly Election 2020) हे पहिले राज्य ठरले असून आज या निवडणूकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा (Third Phase) होत आहे. यासाठी बिहारमधील मतदान केंद्रावर योग्य ती तयारी करण्यात आली असून पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. आज या निवडणूकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांचे भवितव्य आज EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. या तिस-या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत मतदान केंद्रावर योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. हे मतदान सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पार पडणार आहे.

दरम्यान बिहार विधानसभा मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील नागरिकांना घराबाहेर पडून योग्य ती काळजी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे अनिवार्य आहे असेही सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर दुसरीकडे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत ब-याच घडामोडी घडताना दिसत आहे. यात डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र एकूणच परिस्थितीवरुन दिसत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now