पालघर हत्याकांड प्रकरणात आज 47 आरोपीना ठाणे न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. आज आरोपी पक्षाचे वकील अमृत अधिकारी यांनी न्यायालयात आरोपींची बाजू मांडली आहे. ट्विट-
जम्मू -काश्मीरमध्ये आज आणखी 280 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 13 हजार 568 वर पोहचली आहे. ट्विट-
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये रविवारी हिंसाचार झाला. यावर टीएमसीचे खासदार म्हणाले की, "भाजपाचा एक गट येथे सीआयएसएफ संरक्षणाखाली राहत आहे. तो जगदीप धनकर यांच्याशी नियमित संपर्कात आहे. सीआयएसएफने येथे जमलेल्या आमच्या कामगारांवर लाठीचार्ज केला," टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले आहेत. ट्विट-
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून ‘ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना सदिच्छा भेट देण्यात आली त्यावेळेस त्यांच्यासह कुटुंबाची देखील भेट घेण्यात आली.
टॉप्स सिक्युरिटी या कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित चांदोळेचा ताबा 9 डिसेंबर पर्यंत ED कडे देण्याचे आदेश Special PMLA Court ने दिले आहेत.
भारतामध्ये मागील 8-10 दिवसांपेक्षा अधिक काळापासून देशभरातील शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरूद्ध एकवटले आहेत. सध्या सिंधू बॉर्डरवर एकत्र जमून ते आंदोलन करत आहेत. पंजाब , दिल्ली, मध्य प्रदेश, हरियाणा या प्रांतामधून शेतकरी बॉर्डरवर जमून आपली एकजूट दाखवत आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज सिंधू बॉर्डरवर जाऊन आंदोलनकर्त्या शेतकर्यांची भेट घेणार आहेत. दिल्ली सरकार मधील अन्य मंत्री देखील भेटीला जाणार आहेत. शेतकर्यांसाठी बॉर्डरवर केलेल्या तयारीचा ते आढावा घेणार आहेत.
सध्या केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सारे विरोधक देखील एकवटले आहेत. 8 डिसेंबर दिवशी या कृषी कायद्याविरोधात आवाज तीव्र करण्यासाठी शेतकर्यांनी भारत बंद चा नारा दिला आहे. महाराष्ट्रातूनही शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान भारतामध्ये अजूनही कोरोनाचं संकट घोंघावत असल्याने आता लसीकरणासाठी लवकरात लवकर लस बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. युके मध्ये फायझरच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर नुकतीच त्यांनी भारतामध्येही तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. त्यानंतर आता Serum Institute of India कडून देखील emergency use authorisation साठी अर्ज दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.