Kushinagar Shocker: कुशीनगरमध्ये नदीच्या काठावर शौचास बसलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला; गुप्तांगाचा घेतला चावा

येथे खड्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गन्ही जंगलात नदीच्या काठावर शौचासाठी बसलेल्या वृद्धावर मगरीने हल्ला केला

Photo Credit - Pixabay

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे खड्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गन्ही जंगलात नदीच्या काठावर शौचासाठी बसलेल्या वृद्धावर मगरीने हल्ला केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला. यामुळे वृद्ध गंभीर जखमी झाला. वृद्धाचा आरडाओरडा ऐकून लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयातून गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. UPTak या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.  (हेही वाचा - Wildlife Tragedy: आसाममध्ये आलेल्या पुरात काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील 131 वन्य प्राण्यांचा मृत्यू)

खड्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गन्ही जंगलात राहणारा कन्हैया (60) हा बुधवा जंगलाला लागून असलेल्या नदीच्या काठावर शौचास गेला होता. शौच करत असताना कालव्यातून बाहेर आलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. कन्हैया स्वत:ला वाचवण्यासाठी उठताच मगरीने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला आणि तो कालव्यात गेला.

वृद्धाचा आरडाओरडा ऐकून लोकांनी घटनास्थळ गाठून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना गोरखपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. ही घटना निचलौल हद्दीत असल्याची माहिती आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif