येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल; 6 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

07 Mar, 04:47 (IST)

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईच्या निवासस्थानी शुक्रवारी, प्रवर्तन निदेशालयाची टीमने तपासणी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंगच्या तपासासंदर्भात संचालनालयाने ही कारवाई केली. आता अंमलबजावणी संचालनालयाने येस बँकचे संस्थापक राणा कपूर यांच्या विरोधात, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

07 Mar, 04:19 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात डॉक्टरांच्या सूचनेशिवाय वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे किट आणि मास्क न विकण्याचा सल्ला महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

 

07 Mar, 03:19 (IST)

दिल्ली दंगली दरम्यान 'बेजबाबदार रिपोर्टिंग' केल्याबद्दल, केंद्र सरकारने मीडिया वन टीव्ही चॅनेल आणि एशियानेट न्युज टीव्ही चॅनेलच्या कोणत्याही प्रकारच्या प्रसारणासाठी किंवा पुनः प्रसारणासाठी 48 तासांची बंदी घातली आहे.

 

07 Mar, 02:40 (IST)

दोहा एशियन अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2019 मध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या प्राचीची, निषिद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याची चाचणी सकारात्मक आली आहे. यामुळे 20 फेब्रुवारी 2020 पासून नाडाने तिला तात्पुरते निलंबित केले आहे.

07 Mar, 02:10 (IST)

2019 वर्षात देशात जवळजवळ 48 बिलियन डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाल्याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

07 Mar, 01:41 (IST)

पुलवामा हल्ल्यामधील दोन आरोपींना NIA कडून अटक करण्यात आली आहे.

07 Mar, 01:18 (IST)

कोरोना व्हायरसमुळे मुंबई विद्यापीठाकडून बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. 

07 Mar, 01:13 (IST)

मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलॉंग आणि त्याच्या आसपासच्या भागात आज रात्री 10 ते उद्या सकाळी 5 या वेळेत कर्फ्यू लावण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 ते उद्या सकाळी 8 या वेळेत सोहरामध्ये कर्फ्यू लावण्यात येणार आहे.

07 Mar, 24:37 (IST)

कोरोना व्हायरसमुळे हिमाचल प्रदेशातील विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 31 मार्च पर्यंत बायोमेट्रिक पद्धतीने कार्यालयात उपस्थिती लावावी असे अतिरिक्त मुख्य सचिव आरडी धीमान यांनी म्हटले आहे.

07 Mar, 24:05 (IST)

यवतमाळ  येथे कर्जाचा हफ्ता भरु शकत नसल्याने बँक कर्मचाऱ्याकडून  शेतकरी महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

06 Mar, 23:34 (IST)

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1.6 किलो सोने जप्त करण्यात आले असून कस्टम कमिशनर यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.

06 Mar, 23:03 (IST)

इजिप्तमध्ये 12 नवी कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आल्याची माहिती AFP यांनी दिली आहे.

06 Mar, 21:53 (IST)

 

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले असून अनेक देशांनी चीनला जाणारी विमानसेवा बंद केली आहे. यातच महाराष्ट्रतील सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरातील तब्बल 44 लोक इराणची राजधानी तेहरीन येथे अडकून पडले आहेत. यांची तातडीने सुटका करण्यात यावी, याकरिता खासदार श्रीनिवास पाटील यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

06 Mar, 21:22 (IST)

शेअर बाजारात सेनसेक्स 893.99 अंकांनी घसरला असून 37,576.62 वर बंद झाला आहे. तर निफ्टी 279.55 अंकांनी खाली आला असून 10,989.45 वर स्थिर राहिला आहे.

06 Mar, 21:03 (IST)

महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प राज्याला नवी दिशा आणि विकासाला चालना देणारा असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

06 Mar, 20:12 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असून या मागे कोणताही राजकीय उद्देश नसल्याचे त्यांनी प्रसारमाद्यमांना सांगितले. तसेच अयोध्या हे आमच्यासाठी श्रद्धेचे स्थान असून इतरांन रामलल्लाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी त्यावेळी केले आहे. 

06 Mar, 19:17 (IST)

कोरोना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 3 हजारांहून अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर, 80 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समजत आहे. यातच दिल्ली, तेलंगणानंतर आता मुंबई येथेही कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. संशयित रुग्ण दुबईवरून मुंबईत आल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्याच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

 

06 Mar, 18:22 (IST)

कोरोना व्हायरसने चीनसह संपूर्ण देशाभरात थैमान घातला असून अनेक देशात या व्हायरसचे रुग्ण आढळ्याचे वृत्त येत आहे. यातच भूटान देशातही कोरोना व्हायरसने संक्रमित असलेला व्यक्ती आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेथील नागरिकांची चिंतेत .आणखी भर पडली आहे. ट्विट-

 

06 Mar, 17:45 (IST)

महाराष्ट्रातील मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदारांच्या निधीत 1 कोटीने वाढ करण्यात आली आहे. मतदारसंघातील कामांसाठी आमदारांना याआधी 2 कोटींचा निधी देण्यात येत होता. मात्र, यात वाढ करण्यात झाली असून आता आमदारांना 3 कोटींचा निधी मिळणार असल्याची माहीती समोर आली आहे. ट्वीट- 

 

06 Mar, 16:11 (IST)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमिवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार 100 टिकले हीच मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले आहेत. 

Read more


राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सकाळी 11 वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर अर्थ राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पातून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा देण्याचे प्रयत्न होऊ शकतात. या युवकांना बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील सायन उड्डाणपूलाचे बेअरिंग बदलण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हे काम दोन महिने चालणार असून कामादरम्यान काही ब्लॉक्स घेण्यात येतात. त्यावेळेस उड्डाणपूल वाहतूकीसाठी बंद ठेवला जातो. आज सकाळी 6 वाजल्यापासून तिसरा ब्लॉक सुरु झाला असल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहील. हा ब्लॉक 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यादरम्यान प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागू शकते.

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ऍक्सिक बँकेत वळवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना आठ आठवड्यात उत्तर देण्यास बजावले आहे. मोहनीश जबलपुरे यांनी फडणवीसांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन, त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

चीनसह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात दिल्ली आणि तेलंगणामध्ये कोराना व्हायरसचे 2 संशयित आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now