घृणास्पद! जमिनीत पुरलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून 50 वर्षीय नराधमाने शरीरसंबंध ठेवण्याचा केला प्रयत्न, आरोपी गजाआड
एका 50 वर्षीय नराधमाने जमिनीत पुरलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून मृतदेहाशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
वासनेसाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना आसामच्या (Assam) धेमाजी जिल्ह्यात घडली आहे. येथे एका 50 वर्षीय नराधमाने जमिनीत पुरलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून मृतदेहाशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या नराधमाला पोलिसांनी अटक केले असून पुढील तपास सुरु आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी या मुलीचा मृत्यू झाला होता.
आसामच्या सीलापाथर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या अल्पवयीन मुलीचा मृत्यू 17 मे रोजी झाला होता. या मुलीचे निधन झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी हा मृतदेह नदीकाठी पुरला होता. त्यानंतर 18 मे ला या नराधमाने तिचा जमिनीत पुरलेला मृतदेह काढून शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील मच्छिमारांनी त्याला पाहिले आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या आरोपीने आपण शरीरसंबंध ठेवण्यासाठी मृतदेह बाहेर काढल्याचे कबूल केले आहे. अशीच काहीशी साधर्म्य साधणारी घटना राजस्थानच्या (Rajasthan) कोट्यातून (Kota) एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. वडिलांची मालमत्ता प्राप्त करताना, दबाव आणण्यासाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्या वयोवृद्ध आईची नग्न छायाचित्रे व्हॉट्सअॅपवर शेअर केली आहेत. या व्यक्तीचे नाव दीपक तिवारी (Deepak Tiwari) असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 509 ए, 509 बी आणि आयटी कायद्याच्या कलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.