Uttar Pradesh: ब्लाइंड डेटवर गेलेल्या 50 वर्षीय इसमाचे अपहरण; महिला आणि तिच्या साथीदारांना झाशी येथून अटक
3 लाखांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी त्याची सुटका केली.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे 50 वर्षीय व्यक्तीला हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवून त्याचे अपहारण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लल्लू चौबे असे 50 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे तो ब्लाइंड डेटवर (Blind Date) गेला होता. सध्या पोलिसांनी त्याची सुटका केली आहे. चौबे यांना गुरुवारपासून झाशी येथे ओलीस ठेवले गेले होते. त्यांच्याकडून अपहरणकर्त्यांनी 3 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. (Train Derailment Attempt in Prayagraj: प्रयागराजमध्ये वंदे भारतच्या अपघाताचा प्रयत्न? रेल्वेसमोर दुचाकी टाकून तरुणाचा पळ, सुदैवाने दुर्घटना नाही)
अपहरणकर्त्यांना 1 लाख रुपये आधीच दिले गेले होते. चौबे यांना शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला खंडणी देण्यासाठी त्याचा मुलगा म्हणून उभे केले होते. पोलीस कर्मचाऱ्याला चौबे ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी नेण्यात आले. ज्यामुळे अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून त्यांची सुटका करण्यात मदत झाली.
किरण (35) या महिलेसह अखिलेश अहिरवार (30) आणि सतीश सिंग बुंदेला (27) यांच्यासह तीन संशयितांना अटक करण्यात आली. या टोळीने कथितरित्या महिलांचा वापर करून पीडितांना झाशीला येण्याचे आमिष दाखवले होते. जिथे त्यांचे खंडणीसाठी अपहरण केले जात होते. अन्य संभाव्य साथीदारांचा पोलिस तपास सुरू आहे. ()