Bharat Biotech च्या कोरोना लसीच्या II क्लिनिकल चाचण्यांंना 7 सप्टेंबर पासुन सुरुवात; 5 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

06 Sept, 05:29 (IST)

हैदराबाद येथील भारत बायोटेक निर्मित कोरोना लसीच्या चाचण्यांंच्या दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांंना 7 सप्टेंबर पासुन सुरुवात होणार आहे. 380 प्रतिनिधींंवर ही चाचणी होणार असुन चार दिवस त्यांंना देखरेखीखाली ठेवले जाईल.

06 Sept, 05:10 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1736 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 1,03,812 झाली आहे. तर 1736 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 15,973 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

06 Sept, 04:38 (IST)

राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील याच्या पत्नी, तासगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सुमन पाटील यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. सुमन पाटील यांच्यासह  दीर सुरेश पाटील आणि त्यांचा मुलगा रोहित पाटीलअसा तिघांचाही कोरोना व्हायरस अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिंगांनाही सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला हालवण्यात आले आहे.

06 Sept, 04:27 (IST)

संरक्षणंत्री राजनाथ सिंह तेहरानमध्ये आज सायंकाळी पोहोचले. या भेटीत ते इराणच्या संरक्षण मंत्र्याची भेट घेणार आहेत.

06 Sept, 04:00 (IST)

मुंंबई लोकलच्या मध्य रेल्वेमार्गावरील माटुंंगा ते मुलुंंड दरम्यान अप आणि डाउन जलद गती मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

06 Sept, 03:38 (IST)

दिल्ली मध्ये आज मागील 71 दिवसातील सर्वात मोठी कोरोना रुग्णसंंख्या वाढ झाली आहे. आजच्या दिवसात एकुण 2973 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत ज्यानंंतर एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 1,88,193 इतकी तर मृतांंची संंख्या  4,538 इतकी झाली आहे.

06 Sept, 03:04 (IST)

मुंंबई मध्ये आज कोरोनाचे 1735 रुग्ण सापडले आहेत, ज्यानुसार एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 1,53,712 वर पोहचली आहे. मागील 24 तासात मुंंबई मध्ये 33 रुग्णांंचा कोरोनाने मृत्यु झाला आहे तर बरे आजच्या दिवसात एकुण 896 जणांंनी कोरोनावर मात केली आहे.

06 Sept, 02:51 (IST)

कोरोनाचं कारण सांगून संसदेत Question Hour घेतले जात नाहीये म्हणजेच काय तर पंतप्रधान मोदी प्रश्नोत्तराच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाहीत. परंतु महामारी दरम्यान सुद्धा विद्यार्थ्यांना JEE आणि NEET परीक्षा देण्यास सांगितले जाते आहे असे म्हणत AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांंनी टीका केली आहे.

06 Sept, 02:17 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 20,489 रुग्ण आढळले असून 312 जणांचा बळी गेला आहे.

06 Sept, 02:08 (IST)

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी NCB कडून दीपेश सावंत याला अटक केली असून त्याला सकाळी 11 वाजता Esplanate Court हजर केले जाणार आहे.

06 Sept, 01:56 (IST)

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी NCB कडून दीपेश सावंत याला अटक करण्यात आली आहे.

06 Sept, 01:46 (IST)

अहमदाबाद येथे कोरोनाचे आणखी 167 रुग्ण आढळले आहेत.

06 Sept, 01:41 (IST)

आँध्र प्रदेशात कोरोनाचे आणखी 10,825 रुग्ण आढळले तर 71 जणांचा गेल्या 24 तासात बळी गेला आहे.

06 Sept, 01:09 (IST)

महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 258 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

06 Sept, 01:04 (IST)

कर्नाटक येथे कोरोनाचे आणखी 9746 रुग्ण आढळले आहेत.

06 Sept, 24:53 (IST)

छत्तीसगढ येथे कोरोनाचे आणखी 234 रुग्ण आढळले असून एका व्यक्तीचा रुग्णाचा बळी गेला आहे.

06 Sept, 24:32 (IST)

मुंबईतील कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजनांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे.

06 Sept, 24:11 (IST)

पुण्यात पावसाची हजेरी दिसून आली आहे. तर वादळीवाऱ्यासह मान्सून कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

05 Sept, 23:56 (IST)

जम्मू-कश्मीर येथे कोरोनाच्या आणखी 1251 रुग्णांची नोंद झाली आहे.

05 Sept, 23:42 (IST)

केरळात कोरोनाचे आणखी 2655 रुग्ण आढळले तर 11 जणांचा बळी गेला आहे.

Read more


एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राची कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधात एक मोठं युद्ध सुरु असताना सलग दुस-या दिवशी मुंबईत भूकंपाचे (Earthquake in Mumbai) सौम्य धक्के बसले. आज सकाळी 6.30 च्या सुमारास उत्तर मुंबईत भूकंपाचे सौम्य धक्के बसले. 2.7 रिश्टेर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याचे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले आहे. मुंबईसह शुक्रवारी (4 सप्टेंबर) मध्यरात्री 11.41 सुमारास नाशिकमध्ये (Nashik) भूकंपाचे धक्के बसले. 4 रिश्टेर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील (Maharashtra) अन्य जिल्ह्यात कालपासून भूकंपाचे धक्के बसले असल्याचे भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 8,63,062 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत 6,25,773 जणांची प्रकृती सुधारली असून 2,10,978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचसोबत आतापर्यंत 25,964 जणांनी कोरोना व्हायरसमुळे आपली जीव गमावला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तर मुंबई शहरामध्ये काल तब्बल 1,929 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,52,024 वर पोहोचली आहे. आज मुंबईमध्ये 1,110 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,21,671 रुग्ण बरे झाले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now