जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जी. सी. मुर्मू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना केंद्रात नवीन पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जे. जे. रुग्णालयातील पाण्याचा निचरा करण्यात आला असून तेथे आता पाणी साचलेले नाही. ई विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जेजे रुग्णालयात व्यक्तिश: भेट दिली असून विभाग कार्यालयाची यंत्रणा देखील पाणी उपसा करणाऱ्या संयंत्रांसह हजर आहे, असे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.
मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर थांबलेल्या आणि पाण्यात अडकलेल्या मुंबई लोकलमधील 55 प्रवाशांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दालाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले, अशी माहिती एनडीआरएफचे महासंचालक सत्य प्रधान यांनी दिली आहे.
पुणे शहरात आज नव्याने 1,101 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 60,597 झाली आहे. तर 1,159 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 16,758 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता 2,97,737 झाली असून आज 5,698 टेस्ट घेण्यात आल्या.
महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र: मुंबईमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यासह इतर अनेक ठिकाणीही पाणी साचल्याचे आढळले होते.
मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 1,125 रुग्णांची व 42 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण रुग्णांची संख्या 1,19,255 वर पोहोचली आहे. आज शहरामधून 711 रुग्ण बरे झाले आहेत.
आज मुसळधार वारा आणि पावसामुळे बीएसई (BSE) इमारतीच्या वरचे चिन्ह (Signage) निखळले. ते जमिनीवर पडून कोणाचे नुकसान होणार नाही किंवा मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची मदत आम्ही घेत असल्याचे माहिती, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनी दिली.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला ईडीने समन्स बजावला आहे. रियाला 7 ऑगस्ट रोजी मुंबईच्या कार्यालयात एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबई हायकोर्टाने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीला (MMRDA) काही प्रतिबंध आणि अटींसह मॅंग्रोव्ह बफर झोनमध्ये मेट्रो लाइन 4 चे बांधकाम करण्यास परवानगी दिली.
आज महाराष्ट्रात 10,309 कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 6,165 रुग्ण डिस्चार्ज झाले असून, 334 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामधील एकूण रुग्णांची संख्या 4,68,265 झाली आहे. राज्यात सध्या 1,45,961 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 3,05,521 रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) 15 पथके तैनात करण्यात आली आहेत. कोल्हापुरात 4 टीम्स, सांगलीत 2, मुंबईत 5 संघ आणि सातारा, ठाणे, पालघर व नागपूर येथे प्रत्येकी एक एनडीआरएफ पथक तैनात केले आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभुमीवर सीएसटी आणि कुर्ला येथे पालिका शाळांमध्ये तात्पुरते निवारा सुरु करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच असुरक्षित भागातील रहिवाशांना हलविले जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.
आज संपूर्ण भारतीयांसाठी खास आणि अगदी महत्त्वाचा दिवस आहे. करोडो हिंदूंचे स्वप्न असलेले अयोध्या येथील राम मंदिराचे आज भूमिपूजन आहे. आज दुपारी 12.30 वाजता राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण भारतवासियांचे लक्ष लागले आहे. यासाठी काल पासूनच दीपोत्सवला सुरुवात झाली. संपूर्ण अयोध्या नगरी सजून नटून भूमिपूजन सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.
दरम्यान एक दुःखद बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यातील रुग्णालयात निधनात झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांना कोरोना व्हायरसचं लागण झाली असून त्यांनी त्यावर यशस्वीरीत्या मातही केली. परंतु, किडणीच्या आजारानं त्यांचं निधन झालं.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, कोकणात धुव्वाधार पाऊस बरसत आहे. गेल्या 12 तासांत मुंबईच्या पश्चिम उपगनरात 150mm पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान आजही पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबईसाठी रेड अलर्टचा इशारा IMD ने दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)