IPL Auction 2025 Live

Coronavirus in India: मागील 24 तासांत COVID-19 च्या 26,506 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7,93,802 वर

मागील 24 तासांत 26,506 नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे. तर 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जगात तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या भारतातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. मागील 24 तासांत 26,506 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर पडली आहे. तर 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर पोहचला आहे. त्यातील 4,95,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2,76,685 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात एकूण 21,604 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health & Family Welfare) देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसवर अद्याप ठोस लस किंवा औषध उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु, विशेष खबरदारी घेतल्यास वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. दरम्यान अनलॉक 2 च्या माध्यमातून जीवनाची गाडी रुळावर येत असली तरी सतर्क राहणे आवश्यक आहे. (तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

ANI Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 2,30,599 वर पोहचला असून त्यापैकी 1,27,259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 93,652 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण 9667 रुग्णांचा कोरोना संसर्गाने बळी घेतला आहे. दरम्यान कोविड-19 वरील लसी विकासाच्या टप्प्यात आहेत. लसीच्या ट्रायल्स सुरु असल्याने लस उपलब्ध होण्यासाठी काही काळ जाणार आहे. त्यामुळे स्वयंशिस्त पाळत सरकारी यंत्रणांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.