Goregaon Rape Case: मुंबईत पुन्हा लहान मुलीवर लैंगिक अत्याचार; गोरेगावमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर 29 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

ताजी घटना गोरेगावमधून समोर आली आहे. तेथे 4 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या तरूणाने लैंगिक अत्याचार केले.

Rape Representational Image (File Photo)

Goregaon Rape Case: राज्यात गुन्हेगारीचा आकडा वाढला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राज्यात लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कारण, गोरेगावमधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या तरूणाने घरी कोणी नसल्याचे पाहून लहान मुलीवर लैंगिक अत्याचार (Goregaon Rape)केले. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावच्या (Mumbai Crime) प्रेमनगर परिसरात घडली. आरोपी हा 29 वर्षीय असून तो पीडितेच्या घराशेजारी राहतो. (हेही वाचा: Palghar Rape Case: चाकूचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; फरार आरोपींचा शोध सुरू)

त्याची पिडीत मुलीच्या कुटुंबियांची चांगली ओळख असल्याने पीडिता नेहमी आरोपीच्या घरी खेळायला जायची. याचाच फायदा घेऊन आरोपीने घरात कुणी नसताना पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. त्याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारानंतर पीडितेला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित चिमुकली आरोपीच्या घरी गेल्यानंतर आरोपीने तिच्या अत्याचार केले. त्यानंतर तिला घडलेली घटना कुणालाही न सांगण्याची ताकीद दिली. अन्यथा आई-वडिलांना जीवे मारेल, अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली. घडलेल्या प्रकारानंतर पीडितेची तब्येत बिघडली. आईने तिची पाहणी केली असता चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य पाहता गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिडितेशी बोलल्यानंतर तिने शेजारी राहणारा तरूण दोषी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif