Bengaluru Stampede Case: बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी RCB मार्केटिंग प्रमुखांसह 4 जण ताब्यात
या प्रकरणात आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट कंपनीचे कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांचा समावेश आहे.
Bengaluru Stampede Case: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या आयपीएल विजयाच्या उत्सवादरम्यान बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या (Bengaluru Stampede) दोन दिवसांनंतर, पोलिसांनी शुक्रवारी केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरसीबी व्यवस्थापनातील (RCB Marketing) निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनएचे सुनील मॅथ्यू यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट कंपनीचे कर्मचारी किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांचा समावेश आहे.
बेंगळुरू पोलिस प्रमुख निलंबित -
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जबाबदार प्रतिनिधींना अटक करण्याचे निर्देश दिल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी आरसीबी, डीएनए आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की केएससीएचे अधिकारी सध्या फरार आहेत. गुरुवारी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या चुकांमुळे बेंगळुरू शहर पोलिस आयुक्त बी दयानंद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. (हेही वाचा - Chinnaswamy Stampede: चिन्नास्वामी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी आरसीबीची मोठी घोषणा, पीडितांना मिळणार इतके लाख रुपये)
कर्नाटक उच्च न्यायालयाकडून प्रकरणाची दखल -
दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने या घटनेची स्वतःहून दखल घेतली. तसेच राज्य सरकारला 10 जूनपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, सिद्धरामय्या यांनी घोषणा केली की उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल कुन्हा नियोजन, समन्वय आणि गर्दी नियंत्रणातील अपयशांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय न्यायिक आयोगाचे नेतृत्व करतील. आयोगाला त्यांचे निष्कर्ष सादर करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

