Coronavirus:145 नव्या रुग्णांसह महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 635 वर तर 32 जणांचा मृत्यू ; 4 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

05 Apr, 05:22 (IST)

महाराष्ट्रात 145 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची संख्या 635 वर गेली असून एकून आज 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 4 मुंबई, 1 ठाणे आणि 1 अमरावतीतील रुग्णाचा समावेश आहे. महाराष्ट्रात 52 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

05 Apr, 04:13 (IST)

आज देशात कोरोना बाधितांची संख्या 3,113 वर गेल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून सांगण्यात आले आहे.

05 Apr, 03:52 (IST)

महाराष्ट्रात आज कोरोना बाधित 145 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 635  झाली. आतापर्यंत 52 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. 

05 Apr, 02:59 (IST)

COVID-19 विरुद्ध लढण्यासाठी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवरुन सकारात्मक चर्चा झाली. या आजाराविरुद्ध भारत आणि ब्राझील एकत्र पुढे काय रणनीती आखण्यात येईल यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

05 Apr, 02:18 (IST)

 पंजाब येथे कोरोना व्हायरसचे 8 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळल्याने आकडा 65 वर पोहचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

05 Apr, 01:47 (IST)

मध्य प्रदेशात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

05 Apr, 01:31 (IST)

जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या 6 रुग्णांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

05 Apr, 01:03 (IST)

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 3072 वर पोहचला तर 75 जणांचा मृत्यू  झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

05 Apr, 24:38 (IST)

Coronavirus: मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसचे 52 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

05 Apr, 24:09 (IST)

धारावी येथे आणखी 2 कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 5 वर पोहचला आहे.

04 Apr, 23:49 (IST)

तमिळनाडू येथे 74 नवे कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. या 74 पैकी 73 जणांनी दिल्लीत पार पडलेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याची माहिती देण्यात आली आहे.

04 Apr, 23:30 (IST)

उत्तराखंड येथे कोरोना व्हायरसचे नवे 6 रुग्ण आढळून आल्याने आकडा 22 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच 350 तबलीगी जमातीच्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

04 Apr, 23:12 (IST)

दिल्लीत 435 पैकी फक्त 40 कोरोना व्हायरसचे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी दिली आहे.

04 Apr, 23:00 (IST)

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन करण्यात आले असून अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली असून 2.82 कोटी रुपयांची दारु जप्त तर 1221 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

04 Apr, 22:30 (IST)

भारतीय नौदलाच्या जवानांकडून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे गरजूंना राशन वाटप करण्यात येत आहे. तसेच देशभरातील अन्य गरजूंना सुद्धा त्यांच्याकडून मदत केली जाणार आहे.

04 Apr, 22:21 (IST)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर हिमाचल प्रदेशात 30 जून पर्यंत च्युंगम सारख्या गोष्टी विकण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

04 Apr, 21:28 (IST)

BMC ने कांदिवली येथील शताब्दी रूग्णालयातील काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना  चाचणी निगेटिव्ह आली आहे. हे सर्व कर्मचारी सध्या ड्यूटीवर कार्यरत आहेत, असंही बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितलं आहे.

04 Apr, 21:22 (IST)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी घरात राहावं. महावीर जयंती, हनुमान जयंती आणि त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्व नागरिकांना केलं आहे. 

 

04 Apr, 21:05 (IST)

हॉकी इंडिया च्या वतीने पीएम केअर्स फंड साठी आणखीन 75 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे यामध्ये गॉल्फर अनिर्बन लाहिरी यांनी 7  लाख रुपयांचे मोठे योगदान दिले आहे.

04 Apr, 20:12 (IST)

लोकांनी 14 एप्रिल पर्यंत नियमाचे नीट पालन केल्यास लॉक डाऊन वाढवण्याची वेळ येणार नाही , त्यामुळे परिस्थिती कशी होईल हे आता लोकांवरच निर्धारित आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Read more


कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाचा वेग वाढत असल्याने देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सद्यास्थितीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. मात्र अजूनही या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनला लोकं गांभीर्याने घेताना दिसत नाहीयेत. मुंबई वारंवार सूचनेनांतरही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. आजही भायखळा येथील 18भाजी मार्केट मध्ये अशीच गर्दी दिसून आली, यापूर्वी गुरुवरील मुंबई पोलिसांनी अशाच न ऐकणाऱ्या 1,526 जणांना अटक केली होती.

कोरोनामुळे लागू केलेल्या या लॉक डाऊनचा आजचा 11 वा दिवस आहे. त्यामुळे आता काही ठिकाणी अन्न धान्याचा तुटवडा झाल्याचे पाहायला मिळतेय. अशा वेळी  मुंबई व उपनगरातील गरजू आणि गरीबांच्या जेवणाची व्यवस्था विधान परिषद नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातील अंधेरी ते कांदिवली या भागातील किचनच्या माध्यमातून 8000 गरजूना अन्न पुरवले जाणार आहे. तर दुसरीकडे मुंबई शहर जिल्ह्यातील जवळपास 29 हजार गरीब व्यक्तींना दोनवेळच्या जेवणाचे वाटप मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्यातर्फे संयुक्तरित्या करण्यात येईल असे मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. कोरोना संदर्भात चालू असलेल्या घटनांविषयी महाराष्ट्रातील व देशातील जनतेला उद्देशून पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसे राज्य सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे. राज यांच्या निवासस्थानी म्हणजेच कृष्णकुंज वर 11 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now