पैशांचा पाऊस पाडुन पैसे डबल करून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना कासा पोलीस ठाणे यांचेकडून अटक. अशाप्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडण्याचे पोलीस अधीक्षक पालघर यांचे जनतेला आवाहन.
पैशांचा पाऊस पाडुन पैसे डबल करून देतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना कासा पोलीस ठाणे यांचेकडून अटक; 3 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) च्या दुस-या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदार सोशल डिस्टंसिंगच्या (Social Distancing) नियमांचे पालन करुन काटेकोर पद्धतीने हे मतदान केले जात आहे. दरम्यान आज 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होत आहे. यात टप्प्यात एकूण 1463 उमेदवारांचे भविष्य आजच्या मतदानावर अवलंबून असणार आहे. यात 1316 पुरुष तर 146 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तसेच एक तृतीयपंथीयाचा पण समावेश आहे. दुस-या टप्प्यात 2 कोटी 85 लाखांहून अधिक मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी मतदान केंद्रांवर योग्य ती काळजी आणि सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
तर दुसरीकडे गुजरात राज्य विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी सुरेंद्र नगर येथे मतदारांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान नवी दिल्लीतील वायूप्रदूषण दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालले आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली जात आहे.