मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्याने काही वेळापासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्याने कल्याण-कसारा या दरम्यान रेल्वे विलंबाने धावत आहेत. रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या मार्गावरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर निशाणा साधत देशाची दिशाभूल केली जातेय असे म्हंटले आहे, या कायद्यात काहीही गैर नाही गोव्याची जनता ही पूर्णतः CAA च्या पाठिंब्यात आहे, असेही सावंत यांनी म्हंटले आहे.
आझाद मैदान येथे मुंबई प्राइड सोलिडिटी फेरी 2020 मध्ये शरिजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 124 A यासह आयपीसीच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
सोलापूर विमानतळ परिसरात भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. Tv9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, या आगीने रौद्र रुप धारण केले असून अग्मिशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या परिसरातील वाळलेल्या गवताला ही आग लागली असून 7 ते 8 अग्मिशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
नवी मुंबई मनपामध्ये महाविकास आघाडी होणार असून उद्या आघाडीच्या मेळाव्यात यासंबंधी घोषणा करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे. पक्ष प्रमुख शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच नवी मुंबईची एप्रिलमध्ये होणारी निवडणूक महाविकासआघाडी लढणार असेही त्यांनी सांगितले.
लंडनच्या दक्षिणेकडील स्ट्रेटम भागात रविवारी एका हल्लोखोराने चाकू हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली आहे. PTI ने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर हातात मोठा सुरा घेऊन रस्त्यावर फिरत होता. आणि लोकांना भोसकत त्यांच्या अंगावर वार करीत चालत होता. यामध्ये हल्लेखोराने अनेकांना जखमी केले.
मागील काही दिवसांपासून CAA विरोधात होत असलेली प्रदर्शन हे केवळ संयोग नसून ते एक प्रकारचे प्रयोग आहेत. यामागे अशा प्रकारचे राजकारण आहे जे देशातील वातावरण मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील सभेत सांगितले. तसेच त्यांनी यावेळी त्यांनी सिलामपूर, जामियाबाद, शाहीनबागचा देखील उल्लेख केला.
कोरेगाव- भीमाप्रकरणी एनआयएच्या अर्जावर आज शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी होती. तसेच संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. तसेच नेमके या सुनावणीत होणार तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता. यातच कोरेगाव-भीमाप्रकरणाची पुढील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून येत्या 6 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. खेड- शिवापूर टोलनाक्याविरोधात आवाज उठवला असून पुणे जिल्ह्यातील टोलनाके तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
नागपाडा येथे नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात अंदोलन करणाऱ्या नागरिकांना मुंबई पोलिसांनी कलम 149 अंतर्गत नोटीज बजावली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या झेंड्यासह त्यांच्या विचारधारेतही बदल केल्यापासून नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतु, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. ते भारतीय नाहीत. त्यांना ह्या देशातून हाकललेच पाहिजे. कारण भारत म्हणजे काही धर्म शाळा नाही, असे बोलत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात रविवारी 9 फेब्रुवारी होणाऱ्या महामोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोरेगाव- भीमाप्रकरणी एनआयएच्या अर्जावर शिवाजीनगर न्यायालयात आज सुनावणी होणार संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले आहे. तसेच नेमके या सुनावणीत होणार तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दिल्ली येथील एका पर्यटकाचा गोव्यातील दक्षिण गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. उदित अगरवाल असे या मृत पर्यटकाचे नाव आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना बाधित पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. आता राज्य सरकारने दिलेल्या नव्या माहितीनुसार केरळमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये आठवड्याभरात 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली असून ठाकरे सरकारने डीपीसी कपात केल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून नागपूर येथील संविधान चौकात निषेध नोंदवण्यात आला आहे.
राज्यात नवा नागरिकत्व कायदा लागू होणार नाही असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखातीत केले. यावरून आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला होता. हा कायदा केंद्राचा आहे. महाराष्ट्रात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू न करायला तुझ्या बापाचे राज्य आहे का? असे वादग्रस्त विधान आशिष शेलार यांनी केले होते. दरम्यान, आशिष शेलार यांनी केलेल्या यावक्तव्याची माफी मागितली असून त्यांनी व्यक्तीगत कुणावरही टीका केलेली नाही, असे सांगितले.
भाजप नेते आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. उद्धव च्या बापाचे राज्य आहे का? जाहीर निवेदन करणे, आशिष शेलार यांना शोभत नाही. तसेच आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्यावर केली आहे.
आजचा दिवस (3 फेब्रुवारी) विविध दुर्ष्टीने महत्वाचा असणार आहे, एकविसाव्या शतकाच्या तिस-या दशकाचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अल्पकालीन, मध्यम मुदतीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दूरगामी सुधारणांच्या मालिकेचे अनावरण केले. 2019-2020 सालचा अर्थसंकल्प तीन प्रमुख मुद्यांवर आधारित प्रस्थापित करण्यात आला, ज्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि समाजातील सर्व घटकांसाठी चांगल्या नोक-यांसह जीवन जगण्याचे उत्तम स्तर याकरिता प्रयोजन, सर्वागीण आर्थिक विकास आणि भ्रष्टाचारमुक्त, धोरणानुसार सुशासन हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले.
देशभरात 3 दिवसांपासून बंद असलेल्या बॅंकेमुळे नागरिकांना अनेक अडचणीच्या सामना करावा लागला होता. शुक्रवारी, शनिवारी राष्ट्रकृत बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तसेच या संपाला जोडून रविवार आल्याने नागरिकांनाआणखी एक दिवसाची यात वाढ झाली होती. त्यामुळे तीन दिवसांपासून अडकलेली बॅंकेची कामे आज पूर्ण करता येणार आहेत.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
आंतरराष्ट्रीय दृष्टीने पाहायला गेल्यास कोरोना व्हायरसची थैमान अद्याप थांबण्याचे कुठेच चिन्ह दिसून येत नसून आज सुद्धा एअर इंडिया कडून चीन मधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एक खास खाजगी विमान वुहान येथे धाडण्यात आले होते. या विमानाने काल मालदीवच्या 7 देशवासियांना सुद्धा दिल्लीत आणले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)