Arrest Warrant Against Sanjay Raut: संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी

त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. संजय राऊत यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार करत मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि देखभालीच्या प्रकल्पात युवा प्रतिष्ठान या संस्थेने शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या युवा प्रतिष्ठान संस्था चालवतात. तसेच बनावट कागदपत्रं सादर करून हे कंत्राट मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. (हे देखील वाचा: CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पोलिसांना निर्देश)

संबंधित आरोपांप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. पण राऊत कोर्टात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपत्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.