Brazil Road Accident: ब्राझीलमध्ये भीषण रस्ते अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 22 प्रवाशांचा मृत्यू (Watch Video)
दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील मिनास गेराइस राज्यातील महामार्गावर शनिवारी सकाळी ही घटना घडली.
Brazil Road Accident: ब्राझीलमध्ये एका भीषण रस्ता अपघातात ट्रक आणि बसची धडक (Brazil Road Accident) झाली. या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील मिनास गेराइस (Minas)राज्यातील महामार्गावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ट्रकला धडकली. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण समजले नाही. मात्र, चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.(Afghanistan Road Accidents: अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 44 जण ठार; 76 जखमी)
टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले
ब्राझीलमध्ये बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली. ज्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. इतर अनेक जण जखमी झाले आहेत. दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील मिनास गेराइस या राज्यामध्ये शनिवारी सकाळी एका महामार्गावर प्रवासी बस आणि ट्रकची धडक झाली, अशी माहिती आहे. अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. इतर 13 जणांना जवळच्या टेओफिलो ओटोनी शहरातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. अपघातावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते.
ब्राझीलमध्ये भीषण रस्ते अपघात
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बस साओ पाउलोहून निघाली होती. अपघातावेळी बसमध्ये 45 प्रवासी होते. बसचा एक टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस एका ट्रकला धडकली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कारची बसलाही धडक
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, तीन प्रवासी घेऊन जाणारी कारही बसला धडकली, सुदैवाने तिघेही बचावले. कारचा मात्र चक्काचुर झाला. अग्निशमन विभागाचे लेफ्टनंट अलोन्सो यांनी एपीला सांगितले की, बचाव पथके अपघाताच्या ठिकाणी काम करत आहेत आणि अजूनही अनेक मृतांना बाहेर काढायचे आहे.