Coronavirus In India: भारतात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 1324 नवीन प्रकरणांची नोंद; देशातील बाधितांची संख्या 16,116 वर
रविवारी (19 एप्रिल) रोजी भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची,
भारतातील (India) कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आजही त्यामध्ये भर पडली. रविवारी (19 एप्रिल) रोजी भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची, संख्या 16,116 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे 519 लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि सध्या एकूण 13,295 लोक या साथीच्या आजाराशी झुंजत आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 1324 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत, तर 31 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एएनआय ट्विट -
या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 2302 (1 स्थलांतरित) रुग्ण या आजाराने बरे झाले आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या विषाणूमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक, 211 मृत्यू झाले आहेत, तर मध्य प्रदेशात या विषाणूमुळे 70 लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर गुजरातमध्ये संक्रमणामुळे 53, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनुक्रमे 14, 42 लोंकांचा बळी गेला आहे. देशातील 27 राज्ये आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वाधिक, 3651 प्रकरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत. यानंतर दिल्ली 1893 प्रकरणांसह दुसर्या क्रमांकावर आहे, तर 1407 प्रकरणांसह मध्य प्रदेश तिसर्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा: गोवा येथील सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह, मुख्यमंत्री प्रमोद सावंत)
मुंबईच्या धारावीमध्ये 20 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या भागात एकूण सकारात्मक घटनांची संख्या वाढून 138 (11 मृत्यूंसह) झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने याबाबत माहिती दिली. कोरोना विषाणूचे पूर्णतः निर्मूलन करणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. येथे कोरोना विषाणूचे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण कोरोनाची एकूण सात प्रकरणे होती, त्यापैकी सहा आधीच बरे झाली होते. रविवारी शेवटच्या पेशंटचा कोरोना रिपोर्ट नकारात्मक आला, त्यानंतर त्यालाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.