ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच आढळली दोन दिवसात तब्बल 100,000 पेक्षा जास्त कोरोना व्हायरसची प्रकरणे; 30 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला नक्की भेट द्या...
यूकेमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशात आता ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच दोन दिवसात तब्बल 100,000 पेक्षा जास्त कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर आली आहेत.
डॉ. रणदीप गुलेरिया, संचालक, एम्स दिल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अॅस्ट्रॅजेनेका कडून डेटा उपलब्ध आहे. त्यास मंजुरी यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकामधील अभ्यासांच्या आधारे मिळाली आहे. आपल्याकडे एसआयआय मधील डेटा देखील आहे. एकदा का ही आकडेवारी नियामक प्राधिकरणास दाखविली की आपल्याला काही दिवसांतच लसांना मान्यता मिळणे अपेक्षित आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांची प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 12 विशेष अतिरिक्त रेल्वेगाड्या विविध रेल्वे स्थानकांदरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर 1 ट्रेन जोधपूर-चेन्नई-एग्मोर पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांमधून धावणार आहे. पश्चिम रेल्वे सीपीआरओ ही माहिती दिली.
23 डिसेंबर रोजी हरियाणाच्या कर्नाल येथे 'शीख फॉर जस्टीस' (SJF) साठी काम करणार्या दोन तरुणांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी खुलासा केला की, ते अमेरिकेतील गुरमीत सिंग याच्या संपर्कात होते, ज्याने मनीग्राममार्फत त्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा केले होते. हरियाणा पोलिसांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाबे दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात कोरोना विषाणूच्या 3,537 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 4,913 रुग्णांना रुग्नालायामधून सोडण्यात आले आहे व 70 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 19,28,603 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 18,24,934 रुग्ण बरे झाले आहत व 49,463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 53,066 सक्रीय रुग्ण आहेत.
गोव्यात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी 40 ते 50 लाख पर्यटक दाखल झाले असून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
मुंबईत मागील 24 तासांत 594 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 2,72,464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 714 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,92,722 वर पोहोचली आहे.
उत्तराखंड मध्ये आज दिवसभरात 449 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 90,616 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 1504 वर पोहोचली आहे.
डॉ. शीतल आमटे यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालाचा निष्कर्ष समोर आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली आहे. ABP माझा ने ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आलेला रायगड मधील मुरुड-जंजिरा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी सुरु करण्यात आला आहे. नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि दररोज केवळ 400 पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश देण्याच्या अटीवर किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना सीबीआयने पत्राद्वारे उत्तर दिले आहे. "सीबीआय नवीनतम वैज्ञानिक तंत्राचा वापर करून कसून व व्यावसायिक पद्धतीने तपास करत आहे. सर्व बाबींकडे पाहिले जात आहे आणि आजवर कोणत्याही गोष्टीस नकार दिला गेलेला नाही," असे सीबीआयने आपल्या पत्रात म्हटले आहे.
उत्तर प्रदेश: फतेहपूर जिल्ह्यात गावकऱ्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर दलित तरुणाने आत्महत्या केली आहे. बकरी चरायला बाहेर जात असताना झाडावरून पाने तोडल्यामुळे स्थानिकांकडून त्याला मारहाण करण्यात आली होती.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कर्नाटक विधानपरिषदेचे उपाध्यक्ष एस.एल. धर्मगौडा यांच्या मृत्यूबद्दल स्वतंत्र एजन्सीमार्फत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
कारगिल युद्धाच्या वार्तांकित वरिष्ठ मीडियाकर्त्यांप्रमाणे मोदी सरकार लडाख आणि डेपसांग खोऱ्यात माध्यमांना का घेऊन जात नाही? असा सवाल AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना मेदांता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरीच ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. Covaxin चा एक डोस घेतल्यानंतरही त्यांना 5 डिसेंबर रोजी कोविड-19 ची बाधा झाल्याचे आढळून आले होते.
देशातील कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने एकीकडे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. लसीकरणाला कधी सुरुवात होणार या प्रतिक्षेत जनता आहे. त्यातच कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनने भीती निर्माण केली आहे. ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे सर्वच देश खबरदारीची उपाययोजना करत आहेत. भारतातही ब्रिटन, मध्य पूर्वेकडून आलेल्या नागरिकांसाठी क्वारंटाईन सह इतर सूचनांची वेगळी नियमावली जारी करण्यात आली आहे. तसंच 31 डिसेंबरपर्यंत या देशांमधील विमान वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, युके वरुन परत आलेल्या नव्या कोरोना विषाणूचे 20 रुग्ण देशात आढळून आले आहेत.
कोविड-19 च्या नव्या स्ट्रेन चा राज्यात एकही रुग्ण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून विविध नियम लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नाईट कर्फ्यू, 31 डिसेंबरसाठी नवी नियमावली राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
देशात गेले 35 दिवस कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देशा-परदेशातूनही पाठींबा मिळत आहे. दरम्यान, आज केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. दुपारी 2 वाजता विज्ञान भवनात होणाऱ्या या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चर्चेतून काही तोडगा निघणार का? हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)