3 New Airlines in 2025: भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात 2025 मध्ये होणार लक्षणीय वाढ; सुरु होत आहेत Shankh Air, Air Kerala आणि Alhind Air या तीन नव्या कंपन्या
या तीन नवीन विमान कंपन्यांच्या आगमनामुळे भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढेल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर मार्ग आणि किफायतशीर दर मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतीय विमान वाहतूक क्षेत्र (Indian Aviation) सध्या मोठ्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकार आणि खाजगी क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे, देशातील विमानतळांची संख्या आणि क्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. भारतीय विमान कंपन्या त्यांच्या ताफ्यात लक्षणीय वाढ करत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची क्षमता वाढेल. आता भारतीय विमान वाहतूक क्षेत्र 2025 मध्ये तीन नवीन विमान कंपन्यांच्या आगमनाने लक्षणीय वाढ अनुभवणार आहे. शंख एअर (Shankh Air), एअर केरळ (Air Kerala), आणि अलहिंद एअर (Alhind Air). या नवीन कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना अधिक पर्याय आणि सुविधा उपलब्ध करून देतील.
शंख एअर, एअर केरळ आणि अलहिंद एअर यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. या विमान कंपन्यांची अंतिम लाँच तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. नागरी उड्डयन महासंचालनालयाकडून (DGCA) एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC) मिळताच या विमान कंपन्या उड्डाण सुरू करतील. सध्या भारतात 12 विमान कंपन्या त्यांच्या सेवा देत आहेत. पण विशेष म्हणजे एकूण हवाई प्रवाशांपैकी 90 टक्के प्रवासी फक्त दोन विमान कंपन्यांचा वापर करतात.
शंख एअर: शंख एअर ही उत्तर प्रदेशातील पहिली पूर्ण-सेवा विमान कंपनी म्हणून नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपली सेवा सुरू करणार आहे. या कंपनीचे उद्दिष्ट उत्तर प्रदेशातील लखनऊ, वाराणसी, गोरखपूर यांसारख्या प्रमुख शहरांना दिल्ली, मुंबई, बेंगळुरू यांसारख्या महानगरांशी जोडणे आहे, ज्यामुळे प्रादेशिक संपर्क आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.
एअर केरळ: एअर केरळ ही झेटफ्लाय एव्हिएशन प्रा. लि. अंतर्गत भारतातील पहिली अल्ट्रा-लो-कॉस्ट कॅरियर (ULCC) म्हणून केरळमध्ये लाँच होत आहे. यूएईतील उद्योजक अफी अहमद (चेअरमन) आणि अयूब कल्लाडा (व्हाइस चेअरमन) यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) मिळाले आहे.
अलहिंद एअर: अलहिंद ग्रुपच्या अलहिंद एअरला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) मान्यता मिळाली आहे. अलहिंद एअरच्या लाँचमुळे केरळमधील प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि प्रवास अधिक सुलभ होईल. ही विमान कंपनी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (COK) येथून दोन ATR 72-600 विमानांसह सेवा सुरू करेल. लाँच झाल्यानंतर दोन वर्षांत आखाती देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. (हेही वाचा: Nitin Gadkari On Indian Roads: भारतीय रस्ते दोन वर्षांत अमेरिकेच्या महामार्गांना मागे टाकतील- नितीन गडकरी)
दरम्यान, या तीन नवीन विमान कंपन्यांच्या आगमनामुळे भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात स्पर्धा वाढेल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर मार्ग आणि किफायतशीर दर मिळण्याची अपेक्षा आहे. समकालीन विमान कंपन्या देशभरात आणि त्यापलीकडे त्यांचे ताफ्यांचे आकार आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करत असताना, सध्याच्या बाजारपेठेतील वाढीमुळे नवीन खेळाडूंना विमान व्यवसायात सामील होण्यासाठी आकर्षित केले आहे. नवीन विमान कंपन्यांच्या लाँचमुळे उद्योगात मोठे बदल होतील, ज्यामध्ये चांगले कनेक्टिव्हिटी पर्याय, सेवा गुणवत्ता आणि स्पर्धात्मक किंमत यांचा समावेश असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)