आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्यामुळे परत जावू न शकलेल्या नागरिकांच्या 2020-21 साठी रहिवासी स्थितीचे नियम शिथील करण्याची CBDT ला विनंतीपत्र; 3 मार्चच्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

04 Mar, 05:12 (IST)

2019-20 मध्ये भारतात आलेले परंतु आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्यामुळे परत जावू न शकलेल्या नागरिकांच्या 2020-21 साठी रहिवासी स्थितीचे नियम शिथील करण्याचे विनंतीपत्र  CBDT ला मिळाले आहे.

04 Mar, 04:29 (IST)

श्रीलंका एअर फोर्सच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेच्या सारंग आणि सूर्य किरण एरोबॅटिक्स संघानी सादरीकरण केले.

04 Mar, 03:46 (IST)

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरीच्या केंद्र शासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्यांतील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो असलेले होर्डिंग्ज हटविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश दिले आहेत. 

04 Mar, 03:19 (IST)

तामिळनाडू: VK Sasikala यांनी सार्वजनिक जीवनाचा त्याग करणार असल्याचे एका निवदेनात म्हटले आहे. एकत्र राहण्याचे आणि आगामी निवडणुकांमध्ये DMK चा पराभव करण्याचे आवाहनही त्यांनी AIADMK ला केले आहे.

04 Mar, 02:58 (IST)

"कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री"; उद्धव ठाकरे यांच्या विधानसभा भाषणानंतर निलेश राणे यांनी  टोला लगावला आहे.

04 Mar, 02:18 (IST)

महाराष्ट्रात आज 9855 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन 6 हजार 559 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2043349 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.77% झाले आहे. ट्वीट-

 

04 Mar, 01:40 (IST)

मुंबईसह नागपूरमध्येही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये आज 897 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

 

04 Mar, 01:02 (IST)

Coronavirus in Mumbai: मुंबई मध्ये आज 1121 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

04 Mar, 24:55 (IST)

अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयटी छापे टाकल्याप्रकरणी प्रतिक्रीया देताना राजकीय फायद्यासाठी भाजप सीबीआय, ईडी, आयटी संस्थांचा गैरवापर करत आहे, असे आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. 

04 Mar, 24:45 (IST)

लॉकडाऊन टाळायचा असेल तर आपली त्रिसुत्री-मास्क घाला, अंतर ठेवा, हात धुवा हे पाळायलाच लागणार आहे, असे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ट्वीट-

 

04 Mar, 24:03 (IST)

महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका व स्वयंसेवी संस्थांना प्रेरणा मिळण्यासाठी राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देण्यात येणार. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 2015-16, 2019-20 या वर्षांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्विट- 

 

03 Mar, 22:59 (IST)

संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र, कोरोना लसीकरणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याची माहिती नसल्याने अनेक नागरिकांचा गोंघळ उडत आहे. यातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी शेअर केली आहे. ट्वीट-

 

 

03 Mar, 22:26 (IST)

पुण्यातील बिबवेवाडी भागातील गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

03 Mar, 22:22 (IST)

मुख्यमंत्री तासाभराच्या चर्चेत महाराष्ट्रात पोहोचलेच नाही असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली. 

 

03 Mar, 22:07 (IST)

बंद दाराआड ठरलेलं बाहेर आल्यावर तुम्ही नाकारलं असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपावर टिका केली. 

 

03 Mar, 22:02 (IST)

आरे कारशेडमध्ये राजकारण करु नये अशी विनंती  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केली. 

 

03 Mar, 21:56 (IST)

शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका, हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

 

03 Mar, 21:51 (IST)

पेट्रोलची सेंच्युरी आणि गॅसची हजारी झालीय असे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

 

03 Mar, 21:46 (IST)

जो काम करतो तो चुका करतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनात म्हणाले.

03 Mar, 21:38 (IST)

पाठ थोपटून घ्यायला काम करणारी छाती हवी असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.

Read more


महाराष्ट्रात आजची पहाट ही आगीच्या घटनांनी सुरु झाली आहे. ठाण्यातील दायघर भागातील (Daighar Area) एका ऑटो गॅरेजला (Auto Garage) आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. त्याचबरोबर या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कुणालाही दुखापत झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र या आगीत बरीच वित्तहानी झाली आहे. या आगीत 15 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही.

दरम्यान औरंगाबाद वाळूंज एम आय डी सी भागाती कामगार चौकातील ध्रुव तारा कंपनीला देखील आज पहाटेच्या सुमारास आग लागली. ही आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

आज महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. काल विरोधकांनी सरकारवर टिका केल्यानंतर आजच्या अधिवेशनात अजून आरोप-प्रत्यारोप होतात. तसेच सरकार काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now