राजस्थान मध्ये कोरोना बाधितांचा आकडा 179 वर; 3 एप्रिल 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्र सह केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहे.
लॉकडाऊन बंद असल्यामुळे सर्व एअरलाईन्सची विमानसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र विस्तारा एअरलाईन्सच्या नवीन माहितीनुसार, 15 एप्रिलपासून विमानसेवेचे बुकिंग सुरु करणार असल्याची माहिती Vistara एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने दिली आहे. तसेच केंद्र सरकारने नवीन अधिसूचना काढल्यास पुढील कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.
नूयॉर्क कोरना व्हायरसच्या संकटामुळे अत्यंत निर्णायकी क्षणांवर आले आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल 10,482 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 562 जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊन काळात अवैधरित्या मद्य विक्री करणा-या नवी मुंबईतील संजोग बार आणि रेस्टॉरन्ट च्या मॅनेजर आणि वेटर्सना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या हॉटेलमधून 1.31 लाखांचा मद्यसाठा देखील जप्त केला आहे.
नवी दिल्लीत कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 386 वर पोहोचली असून यात 93 नवीन रुग्ण आढळले आहेच. तसेच एकूण रुग्णांपैकी 259 कोरोना बाधित रुग्ण हे तबलिगी जमात कार्यक्रमातील आहे.
महाराष्ट्रात नवे 67 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांचा आकडा 490 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून 50 लोकांना डिस्चार्ज देण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
भारतात कोरोना बाधितांची संख्या 2547 वर गेली असून यात 2322 उपचार घेत असलेले, 162 डिस्चार्ज झालेले आणि 62 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोविड-19 चे भारतात पसरत चाललेला फैलाव लक्षात घेता राज्यसभा निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नव्या तारखांची घोषणा काही कालावधीनंतर जाहीर केल्या जातील असे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या 11 CISF जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती CISF विभागाने दिली आहे. यातील एका जवानाचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मात्र दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तिस-या चाचणीसाठी त्याच्या रक्ताचे नमुने पाठविण्यात आले असून रिपोर्ट येणे बाकी आहे.
मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या 11 CISF जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती CISF विभागाने दिली आहे. या विमानतळावरील 142 जवानांना Quarantine ठेवण्यात आले होते. त्यातील 4 जवानांचे काल पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आणि अन्य 7 जणांचे आज कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.
देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून राजस्थानमध्ये कोरोना ग्रस्तांचा आकडा 166 वर गेला आहे. यात 29 तबलिगी कार्यक्रमातील कोरोना ग्रस्तांचा समावेश आहे अशी माहिती राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दिल्लीतील मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागपूरातील 189 लोकांची ओळख पटली असून त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. तर अन्य 19 जणांचा तपास अद्याप सुरु असल्याची माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
दिल्लीत आतापर्यंत 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. यातील चौघांचा मृत्यू याआधीच झाला असून मागील 24 तासांत एकाचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती मरकज येथील कार्यक्रमातील असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच दिल्लीतील परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
गेल्या 2 दिवसात तबलीगी जमातशी संबंधित कोरोना व्हायरसचे 647 रुग्ण समोर आले आहेत. अंदमान-निकोबार, आसाम, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अशा देशातील 14 विविध राज्यात हे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.
रुग्णावर उपचार सुरु असताना त्यात कुटुंबियांनी कोणताही अडथळा आणू नये असे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आवाहन केले आहे. तसंच डॉक्टरांशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल खेद व्यक्त केला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात कन्टेंमेंट टास्क अंतर्गत 9,25,828 लोकांची कोरोना व्हायरसची तपासणी करण्यात आले. यासाठी आरोग्य विभागाच्या तब्बल 2,455 टीम्स वेगवेगळ्या कन्टेमिनेटेड झोन्समध्ये कार्यरत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राहुल तरुण मित्र मंडळ असोसिएशन यांनी आज 250 स्थलांतरीत कामगारांना अन्नदान केले. त्यापैकी एका कामगाराने सांगितले की, मी कामाच्या शोधात येथे आलो आणि मला येथे अशाप्रकारे जेवण मिळाले. मी सरकारला विनंती करतो की आमची मदत करा.
कोरोना व्हायरसचे संकट भारत देशात अधिक दाट व्हायला लागले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या पार गेली आहे. तर महाराष्ट्र सह केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पहिल्यांदाच मोदी जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. यापूर्वी मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून जनतेचे मनोबल वाढवत इमोशनल नव्हे सोशल डिस्टसिंग वाढवा असा संदेश दिला होता.
महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अधित सतर्क झाले आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत ती ठिकाणी सील करण्यात आली असून जसलोक, सैफी यांसारखी नामांकीत हॉस्पिटल्स मधील रुग्णसेवाही काही प्रमाणात बंद करण्यात आली आहे. तसंच लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन अनेक स्तरातून सातत्याने करण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
इटली, स्पेन आणि अमेरिका या देशांमध्ये तर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जगावर घोंगवणाऱ्या या संकटाला परतवून लावण्यासाठी केंद्र सरकार सह राज्य सरकारही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)