स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या एका आठवड्यात नांदेड, अकोला, चंद्रपूर, परभणी या शहरांसह विदर्भात सर्वत्र पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई'सह उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.
आता गडकिल्ल्यांवर दारु प्यायलात तर कडक शिक्षा होणार आहे. त्याचसोबत 6 महिन्यांच्या तुरुंगवासासोबत 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. राज्याच्या गृहविभागाकडून गडकिल्ल्यांवर कोणी दारु पिताना आढळल्यास शिक्षा करण्यात येईल हा निर्णय घेतला आहे. याबाबत आता सरकारने अध्यादेश जारी केला आहे.
लंडनमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिली आहे. स्ट्रेथममध्ये एका व्यक्तीवर सशस्त्र अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. सध्या अनेक लोकांवर वार केले गेल्याचा विश्वास आहे. पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ही घटना दहशतवाद संबंधित घोषित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रावर अन्याय करणारा अर्थसंकल्प असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी, अन्याय झालेला नाही. अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालादेखील मिळणार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
चंद्रपूरमध्ये मृत वन्यजीवांसोबत फोटो काढण्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी भद्रावती येथील डिफेन्स कॉलनीमध्ये 2 बिबट्या आणि 2 अस्वलांचा मृत्यू झाला होता. या मृत प्राण्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वन्यजीव प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या प्राण्यांची वीजेचा झटका देऊन शिकार करण्यात आल्याची माहितीही उघडकीस आली आहे.
भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला शेतकरी व तहसीलदारांचा अपमान केल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील परतवाडा येथील स्थानिक जयस्तंभ चौकात लोणीकर यांचे पोस्टर जाळले आहेत. राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
चीनमधील कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आज या व्हायरसमुळे चीनबाहेर एकाचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये कोरोनाचे 3 संशयित रुग्ण आढळले आहेत.
राज्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वृत्तपत्र जाहिरात वगळता फक्त टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवर जाहिरातींसाठी गेल्या 5 वर्षांत तब्बल 15 कोटी 51 लाख रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती.
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात विशेष सुनावणीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अर्जावर दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सरकारची बाजू मांडली आहे. यावेळी सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले की, या प्रकरणातील दोषी कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. दोषी पवन जाणूनबुजून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करत नाहीत. त्यामुळे ज्यांचे कायदेशीर पर्याय संपले आहेत त्यांना फासावर लटकवा, असंही सॉलिसिटर तुषार मेहता यांनी म्हटलं आहे.
शाहिनबाग मध्ये गोळीबार करणाऱ्या कपिल गुज्जर नामक तरुणाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल कपिलला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
केजरीवाल यांचा पाकिस्तानशी संबंध आहे असे म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना अटक करा आणि त्यांच्या दाव्याचे पुरावे मागा अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे यावर निवडणूक आयोगाने कारवाई करता त्यांच्या प्रचारावर बंदी आणावी तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे पात्र सुद्धा आपकडून निवडणूक आयोगाला लिहिण्यात आले आहे.
टांझानियामध्ये एका चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकारी याबद्दल पुष्टी केली आहे.
श्रीनगरमधील लाल चौकात सुरक्षा जवानांवर ग्रेनेड दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि दोन नागरिकांसह चौघे जखमी झाले आहेत. काश्मीर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पदवीधरांना दरमहा 5,000रुपये आणि पदव्युत्तर कर्मचार्यांना 7,500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे.
आजचा दिवस (2 फेब्रुवारी) विविध दुर्ष्टीने महत्वाचा असणार आहे, देशभरात सुरु असणाऱ्या बँकाच्या संपाचा आज शेवटचा दिवस आहे मागील दोन दिवसांपासून पगारवाढीच्या प्रलंबीत मागण्यांच्या विरोधात राष्ट्रीयकृत बँकाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. तर आज या संपाच्या दिवसाला जोडून रविवार आल्याने बँका आणखीन एक दिवस म्हणजेच आजही बंद असणार आहेत.
दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीवर अत्यंत महत्वाची सुनावणी होणार आहे. दोषींना फाशी देण्याच्या निर्णयाला पटियाला कोर्टाकडून स्थगिती दिली गेली असताना तिहार जेल प्रश्नसंकडून या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान करण्यात आले आहे. यावर आज दिल्ली मध्ये सुनावणी होणार असून यानंतर पुढील निर्णय स्पष्ट समोर येण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय दृष्टीने पाहायला गेल्यास कोरोना व्हायरसची थैमान अद्याप थांबण्याचे कुठेच चिन्ह दिसून येत नसून आज सुद्धा एअर इंडिया कडून चीन मधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एक खास खाजगी विमान वुहान येथे धाडण्यात आले आहे. या विमानाने काल मालदीवच्या ७ देशवासियांना सुद्धा दिल्लीत आणले होते.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दरम्यान, आज मुंबईच्या तिन्ही रेल्वे मरगांवर तांत्रिक कामाच्या निमित्त मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी तुम्ही कुठे जाई इच्छित असाल तर सुरुवातील लोकलचे वेळापत्रक नक्की तपासून पहा..
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)