Roads Block in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत; भूस्खलन, पूरामुळे 288 रस्ते बंद

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या आकडेवारीनुसार मंडीमध्ये 96, शिमल्यात 76, कुल्लूमध्ये 37, सिरमौरमध्ये 33, चंबामध्ये 26, लाहौल आणि स्पीतीमध्ये सात, हमीरपूरमध्ये पाच आणि कांगडा आणि किन्नौरमध्ये प्रत्येकी चार रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Photo Credit- X

Roads Block in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh)गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन(Landslide) आणि आलेल्या पुरामुळे 280 हून अधिक रस्ते बंद (Roads Block in Himachal Pradesh)करण्यात आले आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बल 150 मार्ग शनिवारी म्हणजेच काल बंद करण्यात आले, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. उनामधील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्या पार्श्वभूमीवर लाहौल आणि स्पिती पोलिसांनी तेथील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जहलमन नाला ओलांडू नये पाण्याची पातळी "जलद गतीने" वाढत आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. (Haridwar flood: हरिद्वार, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने केला कहर, क्रेनने काढण्यात आल्या गाड्या)

कुल्लू, मंडी आणि शिमला जिल्ह्यात 31 जुलैला अचानक आलेल्या पुरानंतर बेपत्ता झालेल्यांचा आकडा 30 आहे. त्यांच्यासाठी शोध मोहिम राबवण्यात आली. बचाव कार्य करण्यात आले. परंतु त्यात कोणतेही मोठे यश मिळाले नाही. आतापर्यंत 28 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाशी संबंधित घटनांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 27 जून ते 9 ऑगस्ट दरम्यान राज्याचे सुमारे 842 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की 288 रस्त्यांपैकी 138 शुक्रवारी आणि 150 शनिवारी बंद होते. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या आकडेवारीनुसार मंडीमध्ये 96, शिमल्यात 76, कुल्लूमध्ये 37, सिरमौरमध्ये 33, चंबामध्ये 26, लाहौल आणि स्पीतीमध्ये सात, हमीरपूरमध्ये पाच आणि कांगडा आणि किन्नौरमध्ये प्रत्येकी चार रस्ते बंद करण्यात आले आहेत. पूह आणि कौरिक दरम्यान अचानक आलेला पूर आणि नेगुलसरीनजवळील राष्ट्रीय महामार्ग 5 वर भूस्खलन झाल्यामुळे किन्नौर जिल्ह्याचा संपर्क राज्याची राजधानी शिमलापासून तुटला. राज्यातील 458 वीज आणि 48 पाणीपुरवठा योजनाही बाधित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रादेशिक हवामान कार्यालयाने रविवारी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला, बिलासपूर, चंबा, हमीपरपूर, कुल्लू, कांगडा, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर आणि उना या पाच जिल्ह्यांतील वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असे त्यांनी म्हटले आहे. हवामान खात्याने चंबा, हमीरपूर, कुल्लू, मंडी, सिरमौर आणि शिमला जिल्ह्यांतील निर्जन भागांमध्ये कमी ते मध्यम स्वरूपाच्या पुराच्या धोक्याचा इशारा दिला आहे. जोरदार वारा आणि सखल भागात पाणी साचल्याने झाडे कोसळण्याच्या घटना होऊ शकतात. 'कच्चा' घरांचे नुकसान होऊ शकते, असे ते म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif